शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

अर्ज करण्यापासून वंचित ५२ हजार शेतकऱ्यांना मिळू शकते कर्जमाफी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 1:20 PM

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी विहित कालावधीत ‘आॅनलाइन’ अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील ५२ हजार २२५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देराज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली.कर्जमाफीसाठी गत २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत थकबाकीदार शेतकऱ्यांकडून ‘आॅनलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले.

- संतोष येलकरअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी विहित कालावधीत ‘आॅनलाइन’ अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील ५२ हजार २२५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली. कर्जमाफीसाठी गत २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत थकबाकीदार शेतकऱ्यां कडून ‘आॅनलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ९६२ शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज केले होते. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात १ लाख ९१ हजार १८७ थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी यापूर्वी विहित कालावधीत आॅनलाइन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून योजनेचा लाभ देण्याचा निर्णय शासनामार्फत गत २८ फेबु्रवारी रोजी घेण्यात आला. त्यानुसार कर्जमाफीसाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे आॅनलाइन अर्ज १ ते ३१ मार्च या कालावधीत ‘आपले सरकार’ सेतू सेवा केंद्रामार्फत स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या मात्र विहित कालावधीत वैयक्तिक व तांत्रिक कारणामुळे आॅनलाइन अर्ज करू न शकलेल्या जिल्ह्यातील थकबाकीदार ५२ हजार २२५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

अर्ज केलेले आणि अर्ज करण्यापासून वंचित असलेले शेतकरी

कर्जमाफीसाठी यापूर्वी आॅनलाइन अर्ज केलेले शेतकरी  -           १३८९६२कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज करू न शकलेले शेतकरी -        ५२२२५

----------------------------------------------------------------------------------

एकूण  -                                                                                       १९११८७

‘येथे ’ उपलब्ध आहे अर्जाचा नमुना!कर्जमाफीसाठी यापूर्वी आॅनलाइन अर्ज करू न शकलेल्या शेतकºयांना ३१ मार्चपर्यंत आपले सरकार सेतू सुविधा केंद्रामार्फत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, तालुका उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच संबंधित बँकेच्या शाखेत उपलब्ध राहणार आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत यापूर्वी विहित कालावधीत कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज करू न शकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांचे अर्ज शासन निर्णयानुसार ३१ मार्चपर्यंत आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.-जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजनाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय