जिल्हा वार्षिक योजनांसाठी विभागात ५१३ कोटी
By Admin | Updated: August 28, 2014 02:19 IST2014-08-28T02:04:58+5:302014-08-28T02:19:50+5:30
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी १ हजार ३८८ कोटी मंजूर

जिल्हा वार्षिक योजनांसाठी विभागात ५१३ कोटी
अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यावर्षी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी १ हजार ३८८ कोटी २३ लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी जुलै अखेरपर्यंत ५१३ कोटी ९१ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गंत सर्वसाधारण योजनांसह अनुसूचित जाती योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजना या तीनही योजनांतर्गत जिल्हास्तरावर विविध विकासकामे केली जातात. त्यासाठी २0१४-१५ या वर्षासाठी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यांकरिता १ हजार ३८८ कोटी २३ लाखांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला होता. मंजूर निधीपैकी जुलै अखेरपर्यंत विभागातील पाच जिल्ह्यांसाठी ५१३ कोटी ९१ लाखांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती, विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन विभागाच्या सुत्रांनी दिली. उपलब्ध निधी विभागातील पाचही जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हानिहाय राबविण्यात येणार्या योजना आणि विकासकामांसाठी संबंधित विभागांना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन कक्षामार्फत निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
*निधी खर्चाला आली गती!
विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते. त्यापृष्ठभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर कामे मार्गी लावण्यासाठी संबंधीत विभागांकडून घाई केली जात आहे. कामे मंजूर करून ती सुरु करण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याने, प्राप्त झालेल्या निधी खर्चालाही गती आली आहे.
* जिल्हानिहाय मंजूर व प्राप्त निधी!
जिल्हा मंजूर निधी प्राप्त निधी
अमरावती ३७२.३५ १२४.२२
अकोला १८५.९४ ७४.१९
यवतमाळ ४१७.२८ १२७.७९
वाशिम १३७.८१ ६२.७२
बुलडाणा २७७.८५ १२४.९९
...............................
एकूण १३८८.२३ ५१३.९१
(आकडे कोटीमध्ये आहेत)