५१ अनाथ मुला-मुलींना मदतीचा आधार
By Admin | Updated: September 2, 2014 20:36 IST2014-09-02T19:48:48+5:302014-09-02T20:36:52+5:30
आई-वडिलांचे छत्र नसलेल्या अकोला तालुक्यातील ५१ अनाथ मुला-मुलींची संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थी म्हणून निवड करून, त्यांना मदतीचा आधार देण्याचा उपक्रम

५१ अनाथ मुला-मुलींना मदतीचा आधार
अकोला: आई-वडिलांचे छत्र नसलेल्या अकोला तालुक्यातील ५१ अनाथ मुला-मुलींची संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थी म्हणून निवड करून, त्यांना मदतीचा आधार देण्याचा उपक्रम महसूल विभागाकडून सुरू करण्यात आला. सोमवारी अकोला तहसील कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात या अनाथ मुला-मुलींना मदत मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अरुण शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे उपस्थित होते. ५१ अनाथ मुला-मुलींची संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली. त्यांचे बँकेत खाते उघडले असून, त्यात ९00 रूयते दरमहा मदत जमा केली जाणार आहे. ....तर दुर्बलांचे जीवन सुसहय़- ज्ञानेश्वर राजूरकर योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या, तर दुर्बल घटकांचे जीवन सुसहय़ होते, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी या कार्यक्रमात केले. सामाजिक जाणिवेतून अनाथ मुलांना शोधणे व त्यांना मदतीचा आधार देण्याचे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.