पारस औष्णिक केंद्रातून मिळू शकताे ५०० सिलिंडर ऑक्सिजनचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 10:54 AM2021-04-20T10:54:01+5:302021-04-20T10:54:07+5:30

Paras thermal power plant : कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामग्री येथे उभारल्यास येथून ५०० सिलिंडर इतका ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकताे़ असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला आहे

500 cylinders of oxygen can be obtained from the Paras thermal power plant | पारस औष्णिक केंद्रातून मिळू शकताे ५०० सिलिंडर ऑक्सिजनचा साठा

पारस औष्णिक केंद्रातून मिळू शकताे ५०० सिलिंडर ऑक्सिजनचा साठा

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यातील महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये ऑक्सिजन संकलनासाठी आवश्यक कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामग्री येथे उभारल्यास येथून ५०० सिलिंडर इतका ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकताे़ असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला आहे

पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रामधील ओझोन वायू प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती करून त्याची अकोला जिल्ह्यात सध्याच्या आपत्तीच्या काळात उपलब्धता करता येते का, याबाबतच्या शक्यतेसंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी साेमवारी पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रास भेट दिली.

औष्णिक विद्युत निर्मिती करतांना आवश्यक असणाऱ्या ओझोन वायूच्या उपलब्धतेसाठी येथे ऑक्सिजन निर्मिती केली जाते. त्यासाठी पारस येथे दोन संयंत्रे आहेत. या ठिकाणी निर्माण होणारा ऑक्सिजन हा ओझोन प्रक्रियेसाठी वापरला जात असल्याने निर्माण होणारा ऑक्सिजन हा सिलिंडरमध्ये भरण्याची व्यवस्था येथे नाही. त्यासाठी आवश्यक कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामग्री येथे उभारल्यास येथून ५०० सिलिंडर इतका ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी पापळकर यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासमवेत महानिर्मिती पारस औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता खराटे व उपमुख्य अभियंता दामोदर तसेच बाळापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी उपस्थित होते.

 

सिलिंडर्स भरता यावे यासाठी संयंत्रे उभारण्याबाबत पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे, महाजेनको व शासनस्तरावर पाठपुरावा करून प्रयत्न सुरू आहेत. पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांनी प्राधान्य देऊन पाठपुरावा करावा, त्यासाठी जिल्हा प्रशासनही प्रयत्न करीत आहे

- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी

Web Title: 500 cylinders of oxygen can be obtained from the Paras thermal power plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.