अकोला शहरात ५0 हजारांवर अवैध नळ जोडण्या!

By Admin | Updated: October 26, 2015 02:02 IST2015-10-26T02:02:49+5:302015-10-26T02:02:49+5:30

पुढील महिन्यात शोध मोहीम, नळांना मीटर बसविणार.

50 thousand illegal tap connections in Akola city! | अकोला शहरात ५0 हजारांवर अवैध नळ जोडण्या!

अकोला शहरात ५0 हजारांवर अवैध नळ जोडण्या!

अकोला: शहरात केवळ २९ हजार वैध नळ जोडण्या आहेत आणि अवैध नळ जोडण्यांची संख्या ५0 हजारांवर आहेत. या अवैध नळ जोडण्या वैध करण्यासाठी नळांना मीटर बसविण्याची मोहीम नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा आदेश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी रविवारी संबंधित विभागाला दिला. मनपा आयुक्तांच्या पाहणीनुसार शहरातील सहा भागांपैकी एका भागाला आठवड्या तून एकदा सहापट पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने ६0 टक्के पाण्याची नासाडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात सुधारणा करून महापालिकेने संपूर्ण शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. त्यानुसार सा तव्या दिवशी होणारा पाणीपुरवठा तिसर्‍या दिवशी करण्यात येत आहे. पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नळांना मोटारपंप लावून पाणी ओढल्या जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पोहोचत नाही.

Web Title: 50 thousand illegal tap connections in Akola city!