आरोग्यसेवक पदाच्या परीक्षेला ४८ उमेदवार गैरहजर

By Admin | Updated: December 1, 2014 00:25 IST2014-12-01T00:25:12+5:302014-12-01T00:25:12+5:30

जिल्हा परिषदची भरती प्रक्रियेत ३0 उमेदवारांनी दिली परीक्षा.

48 candidates absent from healthcare examination | आरोग्यसेवक पदाच्या परीक्षेला ४८ उमेदवार गैरहजर

आरोग्यसेवक पदाच्या परीक्षेला ४८ उमेदवार गैरहजर

अकोला : जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेत ४ आरोग्यसेवक (पुरुष) पदांसाठी अकोल्यातील जिल्हा परिषद सावित्रीबाई फुले कन्या शाळा केंद्रावर रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. या पदांसाठी ३0 उमेदवारांनी परीक्षा दिली असून, ४८ उमेदवार गैरहजर होते.
जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचार्‍यांची रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामध्ये आरोग्य विभागांतर्गत ४ आरोग्यसेवक (पुरुष) पदांसाठी रविवारी दुपारी २ ते ३.३0 या वेळेत उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. एकूण ७८ उमेदवारांपैकी ३0 उमेदवारांनी या पदांसाठी लेखी परीक्षा दिली. उर्वरित ४८ उमेदवार मात्र परीक्षेला गैरहजर होते. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी निम्म्यापेक्षा जास्त उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिले. या परीक्षेच्या पेपर तपासणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उमेदवारांची गुणानुक्रमे यादी जाहीर करण्यात येणार आहे.

Web Title: 48 candidates absent from healthcare examination