मूर्तिजापुरात ४५वी 'प्रतिभा' व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:00+5:302021-02-05T06:14:00+5:30
उपरोक्त तीन दिवसीय व्याखानमालेचे प्रथम पुष्प गुरुवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आदर्श ग्राम पाटोदाचे माजी सरपंच ...

मूर्तिजापुरात ४५वी 'प्रतिभा' व्याख्यानमाला
उपरोक्त तीन दिवसीय व्याखानमालेचे प्रथम पुष्प गुरुवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आदर्श ग्राम पाटोदाचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील गुंफणार आहेत. 'जगायचे राहून गेले 'हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असून, द्वितीय पुष्प शुक्रवार, दि. ५ फेब्रुवारी ला सांयकाळी ७ वाजता 'मना मना दार उघड' या विषयावर मानोसोपचार तज्ज्ञ प्रा. डॉ. पी. एस. पाटील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय सावंगी वर्धा, हे गुंफणार आहे, तर तृतीय पुष्प शनिवार, दि. ६ फेब्रुवारी ला सायंकाळी ७ वाजता 'सत्यशोधक तुकोबा' या विषयावर प्रा. डॉ. राजेश मिरगे महात्मा फुले महाविद्यालाय वरूड हे गुंफणार आहेत. श्रोत्यांनी वरील तिनही व्याख्यानाचा कार्यक्रम प्रतिभा सभागृह श्री गाडगे महाराज विद्यालय रतन टॉकीजसमोर मूर्तिजापूर येथे आयोजित करण्यात आला असून, श्रोत्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्याव, असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे व गाडगे महाराज विद्यालय मंडळाने केले आहे.