४३ किलो गांजा जप्त
By Admin | Updated: August 22, 2014 00:25 IST2014-08-22T00:03:36+5:302014-08-22T00:25:22+5:30
पाण्याच्या टाकीत अडीच लाखांचा गांजा

४३ किलो गांजा जप्त
अकोला - गड्डम प्लॉटमधून रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सुमारे अडीच लाख रुपयांचा ४३ किलो गांजा जप्त केला. गांजा बाळगणारा सचिन कनोजिया याला अटक करण्यात आली असून, त्याला शुक्रवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. कनोजिया याच्याकडून यापूर्वीही गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गड्डम प्लॉट येथील रहिवासी सचिन लक्ष्मण कनोजिया याच्या राहत्या घरामधील पाण्याच्या टाकीमध्ये गांजाचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांना गुरुवारी दुपारी मिळाली. पोलिसांनी दुपारपासूनच कनोजिया याच्यावर लक्ष ठेवले. त्यानंतर ४ वाजेच्या सुमारास सचिन कनोजिया याच्या घरावर छापा मारून घराची झाडाझडती सुरू केली. यामध्ये घराच्या माळय़ावर असलेल्या एका पाण्याच्या टाकीत पोत्यामध्ये ठेवलेला ४३ किलो ६४0 ग्रॅम गांजा रामदासपेठ पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत २ लाख ६१ हजार रुपये आहे. कनोजिया याच्याकडून यापूर्वी रेल्वे स्टेशन परिसरातून गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.