हमीभावाने मका खरेदीसाठी ४०५ जणांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:42+5:302021-05-07T04:19:42+5:30

अकोला : जिल्ह्यामध्ये सहा खरेदी केंद्रांवर हमीभावाने मका खरेदी होणार आहे. याकरिता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने नोंदणी सुरू आहे. ...

405 people registered for purchase of guaranteed maize | हमीभावाने मका खरेदीसाठी ४०५ जणांची नोंदणी

हमीभावाने मका खरेदीसाठी ४०५ जणांची नोंदणी

अकोला : जिल्ह्यामध्ये सहा खरेदी केंद्रांवर हमीभावाने मका खरेदी होणार आहे. याकरिता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने नोंदणी सुरू आहे. जिल्ह्यात मका खरेदीसाठी ४०५ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या मोबाइलवर संदेश पाठविण्यात आले आहे. केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.-----------------------------------------------

गव्हाला १,७०० रुपये सर्वसाधारण दर

अकोला : जिल्ह्यात गव्हाचे उत्पादन चांगले झाले आहे; मात्र पेरणी क्षेत्र कमी असल्याने आवक पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. गुरुवारी बाजार समितीत गव्हाला १ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला. तर २२० क्विंटल आवक झाली होती.

-----------------------------------------------

ढगाळ वातावरणाचा पिकांना धोका!

अकोला : आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यात उन्हाळी पिके जोमात आहेत. तसेच इतर फळबागा व भाजीपालाही शेतात आहे. या वातावरणाचा आंब्यावरही परिणाम जाणवू लागला आहे.

-------------------------------------------------

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त

अकोला :

Web Title: 405 people registered for purchase of guaranteed maize