शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अकोला जिल्ह्यातील ४0 टक्के शाळांमध्ये विजेचे कनेक्शनच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 16:10 IST

- नितीन गव्हाळे अकोला : शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला. लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्यात भर देण्यात आहे. ...

- नितीन गव्हाळे

अकोला: शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला. लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्यात भर देण्यात आहे. असे असतानाही, जिल्ह्यातील ४0 टक्के शाळांमध्येच विजेचे कनेक्शनच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शाळेत वीज नसल्यामुळे तांत्रिक कामे करताना शिक्षकांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. वीज वितरण कंपनीकडून शाळांना व्यावसायिक दर लावला जात असल्यामुळे शाळा वीज कनेक्शन घेण्याबाबत उदासीन आहेत.जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिकच्या जिल्हा परिषद, मनपा, न.पा. खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम अनुदानित आणि स्वयंअर्थसहायित अशा एकूण १,८४१ शाळा आहेत. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून विविध योजना राबविण्यात येतात. शाळा डिजिटल करण्यावर शाळा प्रामुख्याने भर देत आहे. शाळा डिजिटल होत आहेत; परंतु १,८४१ पैकी ५५७ शाळांमध्ये विजेचे कनेक्शनच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यात ग्रामीण भागातील सर्वाधिक शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये वीजच नसल्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान देता येतात. शिवाय इतर तांत्रिक कामे करतानासुद्धा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षण विभागाकडून शाळांनी क्रीडा साहित्य, प्रयोगशाळा साहित्य, इमारत, शैक्षणिक खर्चासाठी तुटपुंजे अनुदान मिळते. या अनुदानातून स्टेशनरी, स्वच्छतागृहांची देखभाल, फर्निचर, विजेचे बिल भरताना तारेवरची कसरत करावी लागते. वीज वितरण कंपनी शाळांकडून व्यावसायिक दराने वीज देयक आकारते. व्यावसायिक दर शाळांना परवडत नसल्यामुळे अनेक शाळांचे वीज बिल थकीत आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीने शाळांमधील विजेचे कनेक्शन कापले आहेत. दर महिन्याला पाच ते आठ हजार रुपये वीज बिल येत असल्यामुळे शाळा विजेचे कनेक्शन घेण्यासाठी उदासीन आहेत. शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघानेसुद्धा शासनाकडे शाळांना घरगुती दराने वीज बिलाची आकारणी करण्याची मागणी अनेकदा केली. त्यासाठी पाठपुरावासुद्धा केला; परंतु शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

पटसंख्येनुसार शाळांना अनुदान!शाळांना शैक्षणिक साहित्य घेण्यापासून ते विजेचे बिल भरण्यापर्यंतच्या वर्षभराच्या खर्चासाठी शासनाकडून अत्यंत तुटपुंजे असे १० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यातही शासनाने अटी घातल्या आहेत. शंभरपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठी १० हजार रुपये, १0१ ते २५0 पटसंख्या असलेल्या शाळांना १५ हजार, २५१ ते १000 पटसंख्येच्या शाळांना २0 हजार आणि त्यापेक्षा अधिक पटसंख्येच्या शाळांना २५ हजार अनुदान शासनाकडून देण्यात आले आहे.४0 टक्के नव्हे तर त्यापेक्षा कमी शाळांमध्ये विजेचे कनेक्शन नाही, ही वस्तुस्थिती आहे. व्यावसायिक दराने वीज बिलाची आकारणी परवडत नसल्याचे शाळांचे म्हणणे आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून वीज कनेक्शन नसलेल्या शाळांनी विजेचे कनेक्शन घ्यावे.-प्रकाश मुकुंदशिक्षणाधिकारी, माध्यमिक

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा