शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील धरणात ३९ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 13:07 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, २३ जुलैपर्यंत पाच जिल्ह्यांत ३८.१९ टक्के जलसाठा संचयित झाला.

ठळक मुद्देअकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात आता कुठे ३३.१९ टक्के जलसाठा संकलित झाला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा संपला असून, अद्याप एक थेंबही वाढ झाली नाही. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ५०.३० टक्के, एकबुर्जी धरणात ८६.७२ टक्के, तर सोनल धरणात ३४.५७ टक्के जलसाठा आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, २३ जुलैपर्यंत पाच जिल्ह्यांत ३८.१९ टक्के जलसाठा संचयित झाला. पण, बुलडाणा जिल्ह्यात अद्याप अपेक्षित पाऊस झाला नसल्याने या जिल्ह्यातील तीन धरणाची जलपातळी शून्य टक्केच आहे. इतरही धरणातील जलसाठा अत्यल्पच आहे.पश्चिम विदर्भात नऊ मोठे, २४ मध्यम, तर ४५२ लघू प्रकल्प आहेत. यात अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात आता कुठे ३३.१९ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ३४.९० टक्के जलसाठा झाला आहे. उमा २९.०२, मोर्णा धरणात २०.३८ टक्के, तर वाण धरणात आतापर्यंत ५८.७४ टक्के जलसाठा संकलित झाला. यामध्ये मागीलवर्षीचा ४८ टक्के जलसाठा शिल्लक होता. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा संपला असून, अद्याप एक थेंबही वाढ झाली नाही. याच जिल्ह्यातील मस व कोराडी मध्यम धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोेरणा ७.६०, तर उतावळी धरणातील पातळी १४ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १०.५३ टक्के, पेनटाकळी धरणात ४.५४ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १७.४८ टक्के, पलढगमध्ये १२.६५ टक्के, मन धरणात १५.४० टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ५०.३० टक्के, एकबुर्जी धरणात ८६.७२ टक्के, तर सोनल धरणात ३४.५७ टक्के जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा धरणात ४३.९२ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९०.५७, अरुणावती ३३.७२, तर बेंबळा धरणात ४०.६५ टक्केच जलसाठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भDamधरण