सावकारांकडून कर्ज घेतलेल्या ३८ हजार शेतकऱ्यांना ३७ कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:33 PM2019-09-10T12:33:23+5:302019-09-10T12:33:45+5:30

अकोला जिल्ह्यात ३८ हजार शेतकºयांना लाभ मिळणार असून, सुमारे ३७ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.

 37 crore loan waiver to 38 Thousand farmers borrowed from lenders | सावकारांकडून कर्ज घेतलेल्या ३८ हजार शेतकऱ्यांना ३७ कोटींची कर्जमाफी

सावकारांकडून कर्ज घेतलेल्या ३८ हजार शेतकऱ्यांना ३७ कोटींची कर्जमाफी

googlenewsNext

अकोला: राज्य मंत्रिमंडळाने १० एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयानुसार विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक शेतकºयांकडून घेतलेल्या कर्जात माफी देण्यात आली होती. यानुसार अकोला जिल्ह्यात ३८ हजार शेतकºयांना लाभ मिळणार असून, सुमारे ३७ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.
कर्जमाफी योजनेमध्ये परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर येईल व्यक्तीस दिलेले कर्ज या योजनेस पात्र असणार नाही, अशी अट असल्यामुळे अकोला जिल्ह्यात एकूण पात्र शेतकरी ४९ होते तसेच त्यांचे रुपये ३ लाख ९६ हजार एवढेच कर्ज माफीस पात्र ठरले होते, तसेच ३८ हजार ५७० शेतकरी व त्यांनी घेतलेल्या ३७ कोटी रुपयांच्या कर्जमाफीस पात्र होऊ शकले नव्हते. या पृष्ठभूमीवर सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विदर्भ व मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकºयांना दिलेली कर्जे माफ करण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे अकोला जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार शेतकºयांना लाभ मिळणार असून, सुमारे ३७ कोटी रुपयाचे कर्ज माफ होणार आहे.

३८ हजार शेतकºयांना  लाभ
अकोला जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकºयांना या सावकारी कर्जमाफीचा लाभ घेता न आल्यामुळे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. तत्कालीन १९६ सावकारांनी जिल्ह्यामध्ये वाटप केलेल्या बहुसंख्य प्रकरणात वाटप करण्यात आलेले लाभार्थी हे सावकारी परवान्यावरील नोंद केलेल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील होते, त्यामुळेच या सावकारी कर्जमाफीचा लाभ अकोला जिल्ह्यातील शेतकºयांना मिळू शकला नव्हता. याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला या कार्यालयामार्फत शासनास अहवालसुद्धा सादर करण्यात आला होता. आजच्या निर्णयामुळे या जिल्ह्यातील ३४२ गावातील ३८ हजार शेतकºयांना ३७ कोटी रुपये सावकारी कर्जातून मुक्ती मिळण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत, असे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.
 

 

Web Title:  37 crore loan waiver to 38 Thousand farmers borrowed from lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.