कुरणखेड येथे ३४ कोंबड्यांचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST2021-02-05T06:19:55+5:302021-02-05T06:19:55+5:30
गावामध्ये लोका बर्ड फ्लूमुळे कोंबड्या मृत पावल्याची चर्चा करीत आहेत. कोंबड्या मरण पावल्याची माहिती कुरणखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ...

कुरणखेड येथे ३४ कोंबड्यांचा मृत्यू!
गावामध्ये लोका बर्ड फ्लूमुळे कोंबड्या मृत पावल्याची चर्चा करीत आहेत. कोंबड्या मरण पावल्याची माहिती कुरणखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश ताथोड यांना मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तीन मृत कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच त्याच परिसरातील कोंबड्या, कबुतर यांची संपूर्ण पाहणी करून तपासणीसुद्धा करण्यात आली आहे. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश ताथोड, डॉक्टर संदीप गावंडे, छत्रपती शिवाजी महाराज आपत्कालीन पथकाचे प्रमुख रंजीत घोगरे उपस्थित होते. तपासणी अहवाल येईपर्यंत नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही आहे. असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. ताथोड यांनी केले आहे.
फोटो
कुरणखेड येथील ३४ कोंबड्या मृत झाल्या आहेत. मृत कोंबड्यांची पाहणी केली आहे त्या कोंबड्यांचे शव पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवत आहे, याचा अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत घाबरण्याचे कारण नाही, तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करू.
- डॉ. गणेश ताथोड, पशुवैद्यकीय अधिकारी, कुरणखेड