शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

पंदेकृविचे ३0 टक्के क्षेत्र नापेर !

By admin | Updated: August 6, 2016 01:45 IST

पश्‍चिम विदर्भातील सतत पावसाचा परिणाम; आतापर्यंंत १४0 टक्के पाऊस.

अकोला, दि. ५: पश्‍चिम विदर्भात यावर्षी सतत पाऊस सुरू असून, आतापर्यंंत १४0 टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. यावर्षी बीजोत्पादनाचा अतिरिक्त कार्यक्रम घेणार्‍या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रावरील ३0 टक्के क्षेत्र नापेर आहे.सलग चार वर्षांंच्या अनिश्‍चिततेनंतर यावर्षी पावसाचे दमदार आगमन झाले आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून सतत पाऊस सुरू असून, ५ ऑगस्टपर्यंंत पश्‍चिम विदर्भात सरासरी ४0 टक्के पाऊस अधिक झाला आहे. या सततच्या पावसामुळे पेरण्यावर परिणाम तर झालाच पेरणी केलेल्या पिकांना डवरणी, निंदणी व कीटकनाशके फवारणीसाठी वेळच मिळत नसल्याने पिकावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. यावर्षीच्या दमदार पावसामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीजोत्पादन कार्यक्रमासोबतच कृषी विद्यापीठाच्या अडीच हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले होते. तथापि, पाऊस उसंतच देत नसल्याने कृषी विद्यापीठाचे मुख्य बीजोत्पादन प्रक्षेत्र व मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत ३0 टक्के क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकर्‍यांना देण्यासाठी यावर्षी या क्षेत्रावर अतिरिक्त बीजोत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तथापि, त्यावर परिणाम झाला आहे. दरम्यान, कृषी विद्यापीठाने या क्षेत्रावर आता अर्ध रब्बीचे नियोजन सुरू केले आहे.यावर्षी पश्‍चिम विदर्भातील अकोला जिल्हय़ात सर्वाधिक ५९५.५ मि.मी. म्हणजेच १५0 टक्के पाऊस झाला असून, सतत २३ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. कृषी विद्यापीठाचे मुख्य बीजोत्पादन प्रक्षेत्र व मध्यवर्ती संशोधन केंद्र याच जिल्हय़ात असल्याने पेरणीवर परिणाम झाला आहे. अमरावती जिल्हय़ात आतापर्यंंत ६७२ मि.मी. म्हणजेच १४७ टक्के पाऊस झाला आहे. वाशिम जिल्हय़ात ६५६.२ मि.मी. १४४ टक्के, बुलडाणा जिल्हय़ात ५१५.४ मि.मी. १३८ टक्के तर यवतमाळ जिल्हय़ात ६५९ मि.मी. म्हणजेच १२६ टक्के पाऊस झाला आहे.यावर्षी चांगला पाऊस झाल्याने ७0 टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे; परंतु जेथे भारी व काळी जमीन आहे त्या ठिकाणी सततच्या पावसामुळे शेतात शिरणे शक्य नसल्याने अशा जवळपास ३0 टक्के क्षेत्रावर पेरणी शिल्लक आहे. या क्षेत्रावर अर्ध रब्बीचे नियोजन करता येईल.- डॉ. डी.एम. मानकर,संशोधन संचालक,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.