पाणीटंचाई कामांच्या देयकांसाठी २.८६ कोटी

By Admin | Updated: August 29, 2014 01:43 IST2014-08-29T01:38:56+5:302014-08-29T01:43:44+5:30

अकोला जिल्ह्यातील थकीत देयके होणार अदा.

2.86 crore for water shortage work payments | पाणीटंचाई कामांच्या देयकांसाठी २.८६ कोटी

पाणीटंचाई कामांच्या देयकांसाठी २.८६ कोटी

अकोला : पाणीटंचाई निवारणासाठी गेल्या उन्हाळ्यात जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी २ कोटी ८६ लाखांचा निधी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. या निधीतून पाणीटंचाई निवारणाच्या कामांची प्रलंबित देयके अदा करण्यात येणार आहेत.
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गेल्या जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अखेरपर्यंंत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांची देयके थकीत होती. त्यामध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांची १ कोटी १७ लाख आणि एप्रिल ते जून या कालावधीत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांचे १ कोटी ६९ लाख, असे एकूण २ कोटी ८६ लाखांची देयके प्रलंबित होती. पाणीटंचाई निवारण उपाययोजनांच्या कामांची थकीत असलेली देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी अखेर शासनामार्फत जिल्ह्यासाठी २ कोटी ८६ लाखांचा निधी प्राप्त झाला. विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला हा निधी उपलब्ध झाला. निधी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला वितरित करण्यात येणार आहे.

Web Title: 2.86 crore for water shortage work payments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.