सर्पदंशाने २८ वर्षीय महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 20:02 IST2020-10-12T20:02:21+5:302020-10-12T20:02:30+5:30

Snake Bite मनात्री येथे २८ वर्षीय महिला घरात झोपेत असताना तिला सर्पदंश झाला

28-year-old woman dies of snake bite | सर्पदंशाने २८ वर्षीय महिलेचा मृत्यू

सर्पदंशाने २८ वर्षीय महिलेचा मृत्यू

मनात्री: तेल्हारा तालुक्यातील मनात्री येथे २८ वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घङली. अनिता शहादेव अढाऊ (२८) असे मृत महिलेचे नाव आहे.

मनात्री येथे २८ वर्षीय महिला घरात झोपेत असताना तिला सर्पदंश झाला. ही बाब महिलेच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच महिलेला तत्काळ शेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता, महिलेला मृत असल्याचे घोषित केले. महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी कुटुंबाचे सांत्वन केले, तसेच तलाठी वेरुळकर यांनी कुटुंबाला भेट दिली. या महिलेच्या पश्चात पती, ४ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. कुटुंबास आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: 28-year-old woman dies of snake bite