शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयच्या जागा २,७०० अन् अर्ज ८ हजारांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:20 IST

अकोला : काही दिवसांपूर्वी परीक्षेविना प्रथमच इयत्ता दहावी व बारावीचा निकाल लागला. कोरोनामुळे बोर्डाने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले. त्यामुळे ...

अकोला : काही दिवसांपूर्वी परीक्षेविना प्रथमच इयत्ता दहावी व बारावीचा निकाल लागला. कोरोनामुळे बोर्डाने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले. त्यामुळे यंदा निकालही ९८ टक्क्यांवर लागला आहे. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरमसाठ झाली असल्याने, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडे (आयटीआय) विद्यार्थ्यांचा कल प्रचंड वाढलेला दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात आयटीआयच्या २,७९६ जागा आहेत. परंतु त्यासाठी ८ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. आता प्रवेशासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. एकेकाळी आयटीआयचे महत्त्व कमी झाले होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओस पडल्या होत्या. परंतु अलीकडच्या तीन-चार वर्षांमध्ये आयटीआयला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसारख्या मेट्रो सिटीमध्ये औद्योगिक क्षेत्रात आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आता या औद्योगिक शिक्षणाकडे कल वाढत चालला आहे. आयटीआयची ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात आयटीआयच्या शासकीय ८ आणि खासगी २ संस्था आहेत. या १० संस्थांमध्ये एकूण २,७९६ जागा आहेत. या जागांसाठी जिल्हाभरातून ८ हजार २७३ अर्ज केले आहेत. जागा कमी अन् उमेदवार जास्त झाल्यामुळे आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चढाओढ होत आहे.

विद्यार्थ्यांनी केलेले प्रवेश अर्ज असे

अकोला- २,६२९

अकोट- १,१९७

बाळापूर- ९८५

बार्शीटाकळी- ७१४

मूर्तिजापूर- १,११३

पातूर- ६७४

तेल्हारा- ९६१

एकूण जागा- २,७९६

एकूण अर्ज- ८,२७३

शासकीय संस्था- ८- २६१६

खासगी संस्था-२- १८०

आयटीआयमध्ये असलेले रोजगाराभिमुख अभ्यासक्रम पाहता, विद्यार्थी व विद्यार्थिनींचा आयटीआयकडे कल वाढत आहे. त्यामुळेच यंदा हजारो विद्यार्थ्यांनी आयटीआयटी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. गुणवत्तेनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी व्यवसाय, नोकरीकडे वळू शकतो. त्यामुळेच आयटीआयला पसंती मिळत आहे.

-आर. टी. मुळे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची)