एलबीटीच्या कारवाईत २६ हजारांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: September 19, 2014 02:08 IST2014-09-19T02:08:46+5:302014-09-19T02:08:46+5:30

अकोला शहरात खुलेआम गुटख्याची विक्री.

26 thousand gutka seized in LBT action | एलबीटीच्या कारवाईत २६ हजारांचा गुटखा जप्त

एलबीटीच्या कारवाईत २६ हजारांचा गुटखा जप्त

अकोला : गुटख्याची साठवणूक व विक्रीवर कडक निर्बंध असताना, शहरात खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. मनपाच्या एलबीटी विभागाने जुना भाजी बाजारात केलेल्या आकस्मिक तपासणीत २६ हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. जप्त केलेला गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. एलबीटी विभागातील कर्मचार्‍यांचे गुटखा माफियांसोबत ह्यकनेक्शनह्ण असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित केले होते, या धर्तीवर गुरुवारी ही कारवाई केल्याची माहिती आहे. तत्कालीन उपायुक्त डॉ.उत्कर्ष गुटे यांच्या आयुक्त पदाच्या कालावधीत एलबीटी विभागाच्या माध्यमा तून संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी उखळ पांढरे करून घेतले. आजरोजी या विभागाची सूूत्रे उ पायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याकडे असली तरी काही कर्मचार्‍यांची दूकानदारी मात्र जोरात सुरू आहे. गुटख्याची साठवणूक व विक्रीवर कडक निर्बंध असताना बाजारात कोट्यवधीच्या किमतीची उलाढाल सुरूआहे. शहरातील कोणते व्यावसायिक गुटखा माफिया आहेत, याची इत्थंभूत माहिती एलबीटी विभागाकडे आहे. गुटख्याची विक्री होत असली तरी त्याचा अधिकृत एलबीटी जमा होत नसल्याचा फायदा संबंधित कर्मचारी उचलत असून, गुटखा माफियांकडून महिन्याकाठी मोठा हप्ता वसूल केला जात असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित केले होते.

Web Title: 26 thousand gutka seized in LBT action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.