शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

२५२ मतमोजणी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण २५ फेर्‍यांमध्ये मतमोजणी; आवश्यक साहित्याचे वाटप

By admin | Updated: May 14, 2014 00:58 IST

अकोला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मतमोजणी कर्मचार्‍यांना मंगळवारी प्रशिक्षण दिले.

अकोला : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दोन दिवसांवर येऊन ठेपली असून, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मतमोजणी कर्मचार्‍यांना मंगळवारी प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित प्रशिक्षणामध्ये या कर्मचार्‍यांना अधिकार्‍यांनी मार्गदर्शन करून त्यांना आवश्यक साहित्यही वितरित केले.
अकोला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी करण्यात येणार असून, ८४ टेबलवर २५ फेर्‍यांमध्ये ही मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी २५२ कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, प्रमोद देशमुख, गजानन निपाने, शैलेष हिंगे व अशोक अमानकर यांनी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. मतमोजणी प्रक्रियेसाठी मतगणना पर्यवेक्षक, मतगणना सहाय्यक व स्थायी निरीक्षकांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शिंदे यांच्यामार्फत करण्यात आली आहे. मतमोजणी कर्मचार्‍यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांना मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले असून, आवश्यक साहित्याचे वितरणही करण्यात आले आहे. यामध्ये एका टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक व एक निरीक्षक अशा कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार असून, त्यांना मतमोजणी करण्याची प्रक्रिया सांगण्यात आली. या प्रशिक्षणाला मतमोजणी कर्मचारी उपस्थित होते.