अकोला जिल्ह्यातील २२५ शेतकरी एकाच दिवशी झाले थकबाकीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 20:08 IST2021-03-16T20:08:30+5:302021-03-16T20:08:55+5:30
MSEDCL News ३३ लक्ष ७१ हजार रूपयांचा भरणा करून अनेक वर्षाच्या कृषीपंप थकबाकीच्या ओझ्यातून मुक्त झाले.

अकोला जिल्ह्यातील २२५ शेतकरी एकाच दिवशी झाले थकबाकीमुक्त
अकोला : महावितरणतर्फे महाकृषी अभियान राबविण्यात येत असून या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना थकबाकीमु्क्त होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत नागपुर परिक्षेत्राचे प्रादेशीक संचालक सुहास रंगारी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील २२५ शेतकरी एकाच दिवशी ३३ लक्ष ७१ हजार रूपयांचा भरणा करून अनेक वर्षाच्या कृषीपंप थकबाकीच्या ओझ्यातून मुक्त झाले. थकबाकी मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रादेशिक संचालकांच्या हस्ते थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बाभुळगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्य अभियंता अकोला परिमंडल अनिल डोये,अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट,अधिक्षक अभियंता हरिष गजबे,कार्यकारी अभियंता विजय कासट,कार्यकारी अभियंता अनिल उईके ,बाभुळगावचे सरपंच .गावंडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना महाकृषी ऊर्जा अभियानाची माहिती देण्यात आली.तसेच मुख्य अभियंता श्री अनिल डोये यांच्या मार्गदर्शनात आणि अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या पुढाकाराने महाकृषी अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या पथनाट्याचेही उध्दाटन यावेळी प्रादेशिक संचालक यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच यावेळी उत्कृष्ट काम करणारे अभियंते व कर्माचारी यांनाही सन्मानित करण्यात आले.