मंदुरा येथे 22 वर्षीय तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 14:08 IST2018-09-06T13:51:04+5:302018-09-06T14:08:07+5:30
मुर्तिजापुर तालुक्यातील पोलीस स्टेशन माना अंतर्गत येत असलेल्या मंदुरा येथे 22 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.

मंदुरा येथे 22 वर्षीय तरुणाची हत्या
कुरूम (जि. अकोला) : मुर्तिजापुर तालुक्यातील पोलीस स्टेशन माना अंतर्गत येत असलेल्या मंदुरा येथे 22 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. मंदुरा येथील रामा चौके यांच्या घरासमोर मध्यरात्री ही घटना घडली.
शुभम देवानंद तेलमोरे असं तरुणाचं नाव असून तो मंदुरा येथील रहिवासी आहे. या तरुणावर चाकूने सपासप वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. माना पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी माना पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.