शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
4
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
5
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
6
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
7
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
8
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
9
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
11
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
12
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
13
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
14
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
15
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
16
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
17
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
18
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
19
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
20
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचन योजनेसाठी अकोल्याला २0.४७ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 02:12 IST

अकोला : शेतकर्‍यांचा सूक्ष्म सिंचन शेतीकडे वाढलेला कल बघता, राज्य शासनाने विविध योजना सुरू  केल्या असून, त्यातील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी राज्याला ३६७ रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. अकोला जिल्ह्याला २0 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

ठळक मुद्देराज्याला मिळाले ३६७ कोटी!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्‍यांचा सूक्ष्म सिंचन शेतीकडे वाढलेला कल बघता, राज्य शासनाने विविध योजना सुरू  केल्या असून, त्यातील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी राज्याला ३६७ रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. अकोला जिल्ह्याला २0 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.सूक्ष्म सिंचन अर्थात ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन योजना सुरू  केली आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना अनुदान दिले जात आहे; २0१२-१३ पासून या योजनेची विभागणी करण्यात आली होती. विदर्भ सिंचन विकास प्रकल्प (व्हीआयआयडीपी) व उर्वरित राज्यासाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन चळवळ (एनएमएमआय) या नावाने ही योजना राबविली जात होती.  या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना ठिबक, तुषार संचासाठी अनुदान देण्यात येत होते; पण अनेक वेळा त्यास विलंब झाल्याने मुख्यत्वे विदर्भातील शेतक र्‍यांना त्याचा त्रास झाला; पण आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू  केली असून, ३६७ कोटी रुपये राज्याला दिले आहेत .  अकोला जिल्हय़ासाठी २0 कोटी ४५ लाख रुपये मंजूर झाले असून, १२ कोटी ४७ लाख रुपये प्राप्त आहेत. त्यातील ५0 टक्के म्हणजे ६ कोटी ११ लाख खर्च झाला. जिल्हय़ात ८ हजार ४४१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

शेडनेट, कांदा चाळीला प्रत्येकी ५0 कोटी!- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी राज्याला ३६७ रुपये, फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेडनेट, पॉलीहाऊसकरिता ५0 कोटी, कांदा चाळ उभारणीकरिता ५0 कोटी, शेततळे अस्तिकरणाकरिता २५कोटी तसेच कृषी यांत्रिकीकरणासाठी ९८ कोटी रुपयांचे अनुदान कृषी विभागाकडे उपलब्ध आहे.- या योजनेंतर्गत ज्या शेतकर्‍यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून या योजनेच्या लाभाकरिता पूर्वसंमती दिलेली आहे, त्या शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकार्‍यांकडे अनुदानाची मागणी करावी. या सर्व योजनांचे अनुदान थेट शेतकर्‍यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येते. ज्या शेतकर्‍यांना अडचणी येत असतील त्यांनी कृषी आयुक्तालयाच्या निदर्शनात आणणे गरजेचे आहे.

 शासनाने शेतीसंदर्भातील विविध योजनांसाठी निधी मंजूर केला आहे. याबाबत काही अडचणी आल्यास शेतकर्‍यांनी टोल फ्री १८00 २३३ ४000 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.- सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त (कृषी), पुणे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरWaterपाणी