शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-महू मार्गाच्या गेज परिवर्तनासाठी २00 कोटी

By admin | Updated: February 27, 2015 01:41 IST

रेल्वे अर्थसंकल्प; अकोल्यावर ‘प्रभू’कृपा.

अकोला- यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात पश्‍चिम विदर्भाकडे दुर्लक्ष करणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी अकोल्यावर मात्र चांगलीच कृपा केली आहे. रतलाम-महू-खंडवा-अकोला या मार्गावर दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला गेज परिवर्तनाचा मार्ग गुरुवारी मोकळा झाला आहे. अकोला ते महूपर्यंतच्या कामासाठी रेल्वेच्या अर्थसंकल्पात २00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अजमेर ते काचीगुडा या नॅरोगेज मार्गाचे गेज परिवर्तनाला रेल्वे मंत्रालयाने हिरवी झेंडी दिल्यानंतर टप्प्याने या मार्गाचे काम पूर्ण करण्यात येत आहे. काचीगुडा ते अकोल्यापर्यंत नांदेड, पूर्णा मार्गे ब्रॉडगेजमध्ये या मार्गाचे परिवर्तन करण्यात आले. आता अकोला ते रतलामपर्यंतच्या मार्गाचे गेज परिवर्तनाचे काम सुरू आहे. रतलाम ते महूपर्यंतचे काम पूर्ण झाले असून, महू ते खंडवा आणि खंडवा ते अकोला या दोन टप्प्यात या मार्गाचे गेज परिवर्तन करण्यात येणार आहे. या कामासाठी सुरेश प्रभू यांनी यंदाच्या बजेटमध्ये भरीव निधीची तरतूद करून अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना वाढदिवसाची भेट दिली आहे. गुरुवारी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना प्रभूंनी या मार्गाच्या गेज परिवर्तनासाठी २00 कोटी रुपयांची तरतूद केली. आतापर्यंत या मार्गावर एवढय़ा मोठय़ाप्रमाणात निधी उपलब्ध झालेला नव्हता. यावेळी मोठी रक्कम मिळाल्याने गेज परिवर्तनाच्या कामाला गती मिळेल, असे खा. धोत्रे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. या मार्गावरील काम महूपर्यंत पूर्ण झाले आहे. दरम्यानच्या कामासाठी आणखी निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे यावेळी मंजूर झालेल्या निधीतून अकोला-आकोटपर्यंतचे काम पूर्ण होणार असल्याने हा निधी या मार्गासाठी दिला जाईल, असा विश्‍वास खा. धोत्रे यांनी व्यक्त केला.