शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

वाडेगाव दंगल प्रकरणातील १९ आरोपी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:30 PM

गावात उसळलेल्या जातीय दंगलीतील १९ आरोपींची सबळ पुराव्याअभावी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

अकोला - वाडेगाव येथे २००७ मध्ये पोलीस चौकीत उपस्थित असताना वाडेगावचे माजी सरपंच तथा शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र मानकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर गावात उसळलेल्या जातीय दंगलीतील १९ आरोपींची सबळ पुराव्याअभावी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. दरम्यान, याप्रकरणी माजी सरपंचावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा खटला न्यायालयात सुरु असून, त्याची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीनावर सुटका केली आहे.वाडेगाव येथे २० फेब्रुवारी २००७ रोजी वाडेगाव येथील शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा वाडेगावचे तत्कालीन सरपंच राजेंद्र मानकर यांच्यावर पोलीस चौकीत प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी जनक्षोभातून गावातील दोन गटात दंगल उसळून मोठ्या प्रमाणात घरांची जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बाळापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने दोन्ही गटातील साक्षीदार तपासल्यानंतर या प्रकरणातील १९ आरोपिंची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अ‍ॅड. मोहन मोयल, चंद्रकांत थानवी यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय