शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर तालुक्यातील १७ हजार ४४२ शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:05 IST

तालुक्यातील सात मंडळांतर्गत ४१ हजार ५३३ शेतकरी खातेदार आहेत. यापैकी २४ हजार ०९२ शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे.

- अनंत वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर: अल्प पाऊस, खरिपाच्या उत्पादनात मोठी घट, आणेवारी कमी आल्याने शासनाने अकोला जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे, तसेच दुष्काळी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळी मदत थेट खात्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बाळापूर तालुक्यातील अर्धे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.अल्प पाऊस, खरीप पिकांच्या उत्पादनात घट आल्याने शासनाने बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. दुष्काळी उपाययोजनांसह प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात येत आहे. तालुक्यातील सात मंडळांतर्गत ४१ हजार ५३३ शेतकरी खातेदार आहेत. यापैकी २४ हजार ०९२ शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे. तालुक्यातील १७ हजार ४४२ शेतकºयांना अजूनही अनुदाची प्रतीक्षा आहे. एकापेक्षा जास्त खातेदार म्हणून सात-बारावर नावे आहेत, अशा इतर खातेदारांच्या खात्यात बँकांनी निधी न देण्याचे पत्र तहसीलदारांना दिले आहे. याबाबत अनेक खातेदारांमध्ये वारसाबाबत वाद आहेत. काही बाहेरगावी असल्याने त्यांचे खाते क्रमांक नसल्याने कोट्यवधींचा शासन निधी कॅनरा बँकेत पडून आहे. खातेदार दररोज तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, बँकांमध्ये चकरा मारत आहेत. तलाठ्यांनी शेतकºयांचे अपडेट खाते क्रमांकाची यादी तहसील कार्यालयाला दिली. याच यादीवर बँकनिहाय शेतकरी खातेदारांची खाते क्रमांकाची यादीसह निधी रक्कम खातेदाराच्या खात्यात जमा करण्यासाठी कॅनरा बँकेचे धनादेश संबंधित बँकांना दिले.संबंधित बँकांनी खातेदारांच्या क्रमांक व इतर वारसाबाबतचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र मागणी न करता अनेक धनादेश तहसील कार्यालयाला परत केले. बँका खातेदारांना योग्य माहिती देत नसल्याने खातेदार भरउन्हात तलाठ्यांकडे, तहसील व बँकेमध्ये चकरा मारत आहेत. २४ हजार खातेदारांचे खाते क्रमांक व सात-बारा इतरांची नसलेली नावे नसल्याने त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले; मात्र ५० टक्के शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ५० टक्के निधीसाठी ७ कोटी ४० लाख ०५६६ रुपये निधीची आवश्यकता आहे. आतापर्यंत २८ कोटी ०१ लाख ३७ हजार ६६८ रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. शेतकºयांच्या खात्यात पैसा वळती करण्यासाठी बँकांना कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत शासन निधी बँकेत पडून राहणार आहे.

शेतक ºयांनी आपले बँक खाते क्रमांक संबंधित तलाठी यांच्याकडे द्यावे. सात-बारावर इतर खातेदारांनी एका खात्यात पैसे देण्यासाठी अधिकार पत्र दिल्यास अनेक खातेदारांच्या बँक खात्यात वळती करण्याचे पत्र देऊ.- पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार, बाळापूर.

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरFarmerशेतकरीdroughtदुष्काळ