शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील धरणांत १६.९९ टक्के जलसाठा; पावसाने दोन टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 14:36 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) मध्यम व लघू मिळून ४८४ धरणात (प्रकल्प) ४ जून रोजी १४ टक्केच जलसाठा शिल्लक होता पण, मान्सूनपूर्व पावसाने जलसाठ्यात दोन टक्के वाढ झाली असून, आजमितीस त्यात १६.९९ टक्के साठा आहे. मात्र, मान्सून गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंतेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील अडाण धरणातील जलसाठा १२ टक्क्यांहून ४३.१४ टक्क्यांवर पोहोचला. याच जिल्ह्यातील एकबुर्जी धरणातील जलसाठा दोन टक्क्याहून १०.७८ टक्केवर पोहोचला आहे.अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर १.१८ टक्केच जलसाठा आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) मध्यम व लघू मिळून ४८४ धरणात (प्रकल्प) ४ जून रोजी १४ टक्केच जलसाठा शिल्लक होता पण, मान्सूनपूर्व पावसाने जलसाठ्यात दोन टक्के वाढ झाली असून, आजमितीस त्यात १६.९९ टक्के साठा आहे. मात्र, मान्सून गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंतेत वाढ झाली आहे.पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे. या तीन जिल्ह्यांतील १८ धरणांपैकी सात धरणांतील जिवंत जलसाठा संपला असून, या धरणांची पातळी शून्य टक्के आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर १.१८ टक्केच जलसाठा आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा धरणात ६.५१ टक्के, तर निर्गुणा व उमा धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील जलसाठा संपला असून, याच जिल्ह्यातील मस व कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. आता तोेरणा ०.२५, तर उतावळी धरणातील पातळी १.८७ टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात शून्य टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १२.७४ टक्के, पेनटाकळी धरणात २.७० टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १८.२२ टक्के, पलढगमध्ये ११.०५ टक्के, मन धरणात ७.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ४३.१४ टक्के, तर एकबुर्जी धरणात १०.७८ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

वाशिम जिल्ह्यातील धरणात वाढला जलसाठा!मान्सूनपूर्व पाऊस व त्यानंतर झालेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणातील जलसाठा १२ टक्क्यांहून ४३.१४ टक्क्यांवर पोहोचला असून, याच जिल्ह्यातील एकबुर्जी धरणातील जलसाठा दोन टक्क्याहून १०.७८ टक्केवर पोहोचला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाbuldhanaबुलडाणाwashimवाशिमDamधरण