जिल्ह्यात १५.६५ लाख मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:47+5:302021-02-05T06:18:47+5:30
अकोला: जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी १५ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात १५ लाख ...

जिल्ह्यात १५.६५ लाख मतदार
अकोला: जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी १५ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात १५ लाख ६५ हजार ९३५ मतदार असून, त्यामध्ये मतदार यादीत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील १४ हजार ८२९ मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघातील मतदारांची प्रारुप मतदार यादी गत सप्टेंबर २०२० मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या १५ लाख ७४ हजार २६९ इतकी होती. त्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये १४ हजार ८२९ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, मयत आणि स्थलांतरित २३ हजार १६३ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी १५ जानेवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात १५ लाख ६५ हजार ९३५ मतदार आहेत. त्यामध्ये ८ लाख ४ हजार ५८६ पुरुष व ७ लाख ६१ हजार २९५ महिला आणि ५४ इतर मतदारांचा समावेश आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय
अशी आहे मतदारांची संख्या
मतदारसंघ मतदार
अकोट २९१२५०
बाळापूर २९४१५७
अकोला पश्चिम ३३१८२०
अकोला पूर्व ३४१४२८
मूर्तिजापूर ३०७२८०
.....................................................
एकूण १५६५९३५