१४ ‘एपीआय’च्या पदोन्नतीवर अकोल्यात बदल्या
By Admin | Updated: June 1, 2014 00:55 IST2014-06-01T00:50:58+5:302014-06-01T00:55:18+5:30
१४ सहायक पोलिस निरीक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीवर अकोल्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.

१४ ‘एपीआय’च्या पदोन्नतीवर अकोल्यात बदल्या
अकोला : राज्यात इतर कार्यरत असणार्या १४ सहायक पोलिस निरीक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीवर अकोल्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळालेले १४ ही सहायक पोलिस निरीक्षक अकोल्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये रुजू होणार आहेत. यासोबतच जिल्हय़ातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत असणार्या पोलिस उपनिरीक्षकांना सहायक पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली. २९ मे रोजी पोलिस प्रशासनाने सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीची यादी जाहीर केली. प्रशासनाने दिगंबर तानाजी सावंत यांची (नाहसू), दिलीप एकनाथ गुजर(विवसू), सुधाकर नथुराम देशमुख (बृन्हमुंबई), माधवराव रावसाहेब गरूड(एसीबी), अशोक अंबादास मोहोड(गोंदिया), गजानन नामदेव म्हैसने (रागुवि), सारंगधर वासुदेव नवलकर (बुलडाणा), राजेश्वर भागोजीराव खनाळ (औरंगाबाद ग्रामीण), शैलेश लक्ष्मीनारायण आंचलवार (बृन्हमुंबई), विजय मुरलीधर नाफडे (बृन्हमुंबई), विठ्ठल श्रावण मोहेकर (नाशिक ग्रामीण), गणेश आनंदराव भाले (बुलडाणा), प्रमोद सदाशिव वाघ (नाशिक शहर), सतीश राधेलाल उपाध्याय (अमरावती ग्रामीण) यांची सहायक पोलिस निरीक्षक पदावरून पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीवर अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे पाठविण्यात आले आहेत. खदान पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले एपीआय दिलीप शंकरराव वडगावकर यांना पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती देऊन अमरावती ग्रामीणला पाठविण्यात आले आहे.