शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
2
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
3
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
4
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला
5
अबब! ही तर फक्त सुरुवात...पारा आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, IMDचा इशारा
6
बापरे एवढी बेरोजगारी! IIT च्या ७००० विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना; मुंबई, दिल्लीचे माजी विद्यार्थांना साकडे
7
फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."
8
'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?
9
Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल
10
“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका
11
"संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही, मुस्लिम आरक्षण संपवणार", अमित शाह स्पष्टच बोलले
12
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
13
Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा"
14
हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... 
15
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
16
"RCB तून बाहेर पड आणि दिल्लीकडून खेळ मग...", दिग्गजाचा Virat Kohli ला सल्ला!
17
बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी
18
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
19
CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा
20
'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

दूध उत्पादन वाढीसाठी आणखी १३२६ गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 2:13 PM

विशेष प्रकल्पात आणखी १३२६ गावांचा समावेश ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आला.

- सदानंद सिरसाटअकोला: विदर्भ व मराठवाड्यातील दूध उत्पादन वाढीसाठी कृषी विभाग आणि मदर डेअरी फ्रुट्स अ‍ॅण्ड व्हेजिटेबल्स यांच्यावतीने संयुक्तपणे राबविण्यात येत असलेल्या विशेष प्रकल्पात आणखी १३२६ गावांचा समावेश ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील ५२ गावे आहेत.राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्रालयाने नियुक्त केलेल्या प्रकल्प व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अध्यक्षांनी नव्या गावांचा समावेश करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मराठवाडा, विदर्भात दूध उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रकल्प कार्यक्षेत्र निश्चित केले आहे. त्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांमध्ये मदर डेअरी फ्रुट्स अ‍ॅण्ड व्हेजिटेबल प्रा. लि. यांच्यामार्फत दूध संकलनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सोबतच उत्पादनात वाढ करण्यसाठीच्या उपाययोजनाही होणार आहेत. या विशेष प्रकल्पात ७ जून २०१८ रोजी विदर्भ, मराठवाड्याच्या ११ जिल्ह्यांतील २९३६ गावांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये त्याच जिल्ह्यांतील १३२६ गावांचा नव्याने समावेश करण्याचा आदेश प्रकल्प व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अध्यक्षांनी दिली. त्यानुसार या सर्व गावांची निवड केल्याचा आदेश ३ फेब्रुवारी रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांत उपक्रमहा उपक्रम विदर्भ, मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. यापूर्वी या जिल्ह्यातील २९३६ गावांची निवड करण्यात आली. १३२६ गावांचा नव्याने समावेश झाला. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील २०९, वर्धा-१४८, चंद्रपूर-२३९, अमरावती-२५९, अकोला-५२, बुलडाणा-१००, यवतमाळ-४५, लातूर-७०, नांदेड-१५२, उस्मानाबाद-४४ व जालना जिल्ह्यातील ८ गावे आहेत.

अकोला जिल्ह्यातील या गावांचा समावेशदूध उत्पादन वाढीच्या विशेष प्रकल्पात नव्याने समावेश झालेल्या गावांमध्ये अकोला तालुक्यातील सोनाळा, दुधलम, दोडकी, वाशिंबा, डाबकी, पैलपाडा, कोठारी, तपलाबाद, निपाणा, सुकापूर, कोळंबी, वणी, सुकोडा, खडकी टाकळी, कासमपूर, खरब बुद्रूक, अन्वी, अमानतपूर, आपातापा, सांगवी मोहाडी, दापुरा, कंचनपूर, पळसो बुद्रूक, सांगवी खुर्द, कौलखेड, वल्लभनगर, दोनवाडा, खांबोरा, बार्शीटाकळी- कातखेड, भेंडगाव, महान, रेढवा, गोरव्हा, मूर्तिजापूर-राजनापूर खिनखिनी, नवसाळ, कवठा सोपीनाथ, सोनोरी, खोडद, बोरगाव, उमरी, कासारखेड, दहातोंडा, अलेदतपूर, वाई-माना, कार्ली, मलकापूर, गोरेगाव, हिवरा कोरडे, पिवशी, लंघापूर, राजुरा घाटे, विराहित.

 

टॅग्स :Akolaअकोलाmilkदूध