शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतक-यांना १३0 कोटींचे वाटप बाकी

By admin | Updated: March 10, 2015 02:06 IST

१ हजार २ कोटींच्या मदतनिधीतून ८ मार्चपर्यंत १६ लाख ७३ हजार ३0२ शेतकर्‍यांना ८७२ कोटी ८ लाखांच्या मदतीचे वाटप.

अकोला: दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी प्राप्त झालेल्या मदतीचे वाटप ७ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा शासनामार्फत आदेश देण्यात आला असला तरी, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत १६ लाख ७३ हजार शेतकर्‍यांना ८७२ कोटी ८ लाखांची मदत वाटप करण्यात आली असून, १३0 कोटींच्या मदतीचे वाटप अद्यापही बाकी आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनामार्फत मदत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी १ हजार २ कोटींचा मदतनिधी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्राप्त झाला. प्राप्त झालेला मदतनिधी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत तहसिल स्तरावर वितरित करण्यात आला. मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम १४ जानेवारीपासून तहसील कार्यालयांकडून सुरू करण्यात आले. त्यामध्ये पाचही जिल्ह्यात प्राप्त १ हजार २ कोटींच्या मदतनिधीतून ८ मार्चपर्यंत १६ लाख ७३ हजार ३0२ शेतकर्‍यांना ८७२ कोटी ८ लाखांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. उर्वरित १३0 कोटींच्या मदतनिधीचे वाटप अद्याप बाकी आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना ही मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.