शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

राष्ट्रीय बॉक्सींग प्रशिक्षण शिबिरात अकोल्याचे १३ बॉक्सर

By रवी दामोदर | Published: December 20, 2023 7:25 PM

शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवित स्थान केले पक्के

अकोला: येथील वसंत देसाई स्टेडियममध्ये ६७ वी राष्ट्रीय शालेय बॉक्सींग स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १७ ते २२ डिसेंबर दरम्यान करण्यात आले असून, त्यामध्ये अकोला क्रीडा प्रबोधनीच्या १३ बॉक्सरांचा समावेश आहे. शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवित खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. 

अकोला येथे आयोजित ६७वी राष्ट्रीय शालेय बॉक्सींग स्पर्धेत हे खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन दाखवून महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पदक मिळवून देतील असा आशावाद क्रीडा प्रेमींनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत ३७ वजनगटामध्ये मुले सहभागी होत आहेत. त्यापैकी विविध गटांमध्ये अकोल्याचे १३ बॉक्सरांचा समावेश असून, हि बाब जिल्ह्यासाठी भुषणीय आहे. महाराष्ट्र संघामध्ये राष्ट्रीय पातळीचे खेळाडू असून क्रीडा प्रबोधिनी अकोला येथील एकुण ११ खेळाडुंचा समावेश आहे.

त्यामध्ये वैभव दामोदर, गोपाल गणेशे, रविंद्र पाडवी, आदित्य तायडे, वैभव जारवाल, कनक खंडारे, अथर्व भट्ट, तन्मय कळंत्रे, शोएब गाडेकर आणि रेहान शाह यांचा सहभाग आहे. संघ हा सर्वोत्तम कामगिरी करण्यास सज्ज असून, प्रशिक्षक म्हणुन योगेश निषाद, आदित्य मने व  गजानन कबीर हे महाराष्ट्र संघाची जबाबदारी सांभाळत आहेत.  प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र संघ उच्चतम कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावेल अशी अपेक्षा बाळगण्यात येत आहे. शिबिर जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट यांच्या निदर्शनाखाली होत आहे. खेळाडू करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्वराष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा अकोल्यात संपन्न होत असून, त्यासाठी देशभरातून खेळाडू शहरात येणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली असून, त्यामध्ये अकोल्याच्या १३ बाॅक्सरांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्राच्या संघात ११ खेळाडूंचा सहभाग असून, हे खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाboxingबॉक्सिंग