१२ दुकाने; विरोधकांचा सभागृहात गदारोळ

By Admin | Updated: September 3, 2015 01:54 IST2015-09-03T01:54:32+5:302015-09-03T01:54:32+5:30

सत्ताधारी चर्चा करीत नसल्याचा आरोप करीत काँग्रेस-भारिपचा सभात्याग.

12 shops; Confrontation Hall of Parliament | १२ दुकाने; विरोधकांचा सभागृहात गदारोळ

१२ दुकाने; विरोधकांचा सभागृहात गदारोळ

अकोला : भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीसह १२ दुकानांना परवानगी देण्याच्या मुद्यावर विरोधी पक्ष काँग्रेस व भारिप-बमसंच्या नगरसेवकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. स्थगित सर्वसाधारण सभेतील महत्त्वाच्या विषयांवर सत्ताधारी चर्चा करण्यास तयार नसल्याचा आरोप करीत काँग्रेस व भारिपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सभागृहात थांबणे पसंत केले, हे येथे उल्लेखनीय. भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीचा प्रस्ताव अकोलेकरांमध्ये संभ्रम निर्माण करणारा आहे. यासंदर्भात प्रशासनाने सविस्तर माहिती सादर करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांनी प्रशासनाने १२ वर्षांत मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन का के ले नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या मुद्यावर प्रशासनाची भूमिका गैरसमज निर्माण करणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त करीत महापौरांनी गठित केलेल्या समितीला त्यांनी विरोध दर्शविला. खुले नाट्यगृहानजीकच्या १२ दुकानांना पुननिर्माणाची परवानगी कोणत्या आधारे देता, अशी विचारणा करीत विरोधी पक्षनेता साजीद खान, भारिपचे गटनेता गजानन गवई, अरूंधती शिरसाट, अँड.धनश्री देव, शाहीन अंजूम यांनी अक्षरश: सभागृह डोक्यावर घेतले. न्यायालयाच्या निर्णयाचा हा अवमान असल्याचा आरोप करीत, गटनेता गजानन गवई सभागृहाने या विषयाला मंजुरी दिल्यास महापौरांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच स्थगित सर्वसाधारण सभेमध्ये तेराव्या वित्त आयोगातून विविध योजनांमध्ये निधी वळती करण्याचे विषय होते. सत्ताधारी निधीचे समान वाटप करीत नसून, संबंधित विषयांवर चर्चा करीत नसल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. यावेळी काँग्रेससह भारिपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत या संपूर्ण विषयावर जिल्हाधिकार्‍यांकडे तसेच पोलिसात तक्रार करणार असल्याचे विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी सांगितले.

Web Title: 12 shops; Confrontation Hall of Parliament