१,१४,३३२ बालकांना पोलिओ लस
By Admin | Updated: April 3, 2017 03:36 IST2017-04-03T02:41:04+5:302017-04-03T03:36:49+5:30
सुदृढ पिढीसाठी पोलिओ लसीकरण अत्यावश्यक.

१,१४,३३२ बालकांना पोलिओ लस
अकोला, दि. २- पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुसर्या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, अकोला जिल्हय़ातील १,१४,३३२ बालकांना पोलिओ लसीकरणाचे डोस देण्यात आले. सृदृढ पिढीसाठी पोलिओ लसीकरण अत्यावश्यक असल्याचे आवाहन या मोहिमेदरम्यान जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी केले.
जिल्हय़ातील ग्रामीण कार्यक्षेत्रात १0३२, शहरी कार्यक्षेत्रात ११३ असे एकूण ११४५ बूथ स्थापन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील १,0७,२९२ लाभार्थींंंंपैकी ९७९८६ बालकांना लस देण्यात आली. शहरी भागातील २५,४४७ पैकी १६,३४६ लाभार्थींंंंना पोलिओ लस देण्यात आली.
जिल्हय़ातील एकूण १,१४,३३२ बालकांना लस देण्यात आली आहे. जिल्हय़ातील ८५ टक्के लाभार्थींंंंना पोलिओ डोस देण्यात आला असून, उर्वरित बालकांना आयपीपीआय अंतर्गत घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ रविवारी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड येथून करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या वाघोडे, सरपंच शिल्पा भोपळे, हरिभाऊ वाघोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, डॉ. विनोद दारोकार, विस्तार अधिकारी कृष्णा वाडेकर या मान्यवरांच्या हस्ते 0 ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लस देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धिप्रमुख प्रकाश गवळी यांनी केले, तर आभार संजय घाटे यांनी मानले. मोहीम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, डॉ. मनीष शर्मा, डॉ. सगणे, डॉ. मेघा गोळे, अनिता इधोळ, अनंत सुरोशे, मोहन राऊत, प्रशांत ठाकरे, संजय सावळे, सचिन उनवणे, संदीप वानखडे, विजय घुगे, गजानन ताकझुरे, नरेंद्र बेलुरकर व स्मिता जोशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.