११ विज्ञान प्रतिकृती राज्य स्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2016 01:29 IST2016-01-22T01:29:42+5:302016-01-22T01:29:42+5:30

३१ जानेवारीपासून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अकोला जिल्ह्यातील ११ विज्ञान प्रतिकृतींची राज्य स्तरावर निवड.

11 Science replica at the state level | ११ विज्ञान प्रतिकृती राज्य स्तरावर

११ विज्ञान प्रतिकृती राज्य स्तरावर

अकोला: बारामती येथे ३१ जानेवारीपासून सुरू होणार्‍या पाच दिवसीय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी अकोल्यातील ११ विज्ञान प्रतिकृतींची निवड करण्यात आली आहे. बुधवारी न्यू इंग्लिश हायस्कूल येथे पार पडलेल्या मॉडेल अपग्रेडेशन कॅम्पमध्ये या विज्ञान प्रतिकृतींची निवड करण्यात आली. रविवार ३१ जानेवारी ते गुरुवार ४ फेब्रुवारीदरम्यान बारामती स्थित विद्या नगरी परिसरातील विद्या प्रतिष्ठान येथे ह्यसमावेशीत समाज विकासासाठी विज्ञान व गणितह्ण या विषयावर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होऊ घातले आहे. त्या अनुषंगाने राज्यभरातील विविध जिल्ह्यातून तब्बल ३४८ विज्ञान प्रतिकृतींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील एकूण ११ विज्ञान प्रतिकृतींची निवड करण्यात आली आहे. विज्ञान प्रतिकृतीच्या निवडीसाठी बुधवारी न्यू इंग्लिश हायस्कूल येथे ह्यमॉडेल अपग्रेडेशन कॅम्पह्ण घेण्यात आला. या कॅम्पमध्ये महिनाभरापूर्वी सस्ती येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनामधील सर्वोत्कृष्ट विज्ञान प्रतिकृती ठेवण्यात आल्या असून, यातील ११ विज्ञान प्रतिकृतींची निवड करण्यात आली. विज्ञान प्रतिकृतींची तपासणी व मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रा. डॉ. एम.एम. देशमुख, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय देव्हडे, सुधाकर नाईक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दत्तराव सोळंके, गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मनीष अहिर, शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वजिरे, प्रा. अग्निहोत्री यांची उपस्थिती होती. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवडण्यात आलेल्या विज्ञान प्रतिकृतींची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

Web Title: 11 Science replica at the state level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.