११ एकरातील मुगाचे पीक उपटून फेकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 10:49 AM2020-08-05T10:49:39+5:302020-08-05T10:50:04+5:30

खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने उद्विग्न होत मांजरी येथील शेतकऱ्याने ११ एकरातील मुगाचे पीक उपटून फेकले.

11 acres of Mug crop uprooted and thrown away! | ११ एकरातील मुगाचे पीक उपटून फेकले!

११ एकरातील मुगाचे पीक उपटून फेकले!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हातरुण: मांजरी परिसरात मुगाच्या पिकाला फूलधारणा झाल्यानंतर अचानक मुगाचे पीक शेंड्यावर सुकू लागले आहे. यामुळे पेरणीपासून लागलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने उद्विग्न होत मांजरी येथील शेतकऱ्याने ११ एकरातील मुगाचे पीक उपटून फेकले. कोरोनाच्या संकटकाळात पैसा जवळ नसतानाही कर्ज काढून पेरणी केली. त्यानंतर पीक शेतात डोलू लागले; मात्र अचानक मूग पिकावर रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यावेळी नुकसानग्रस्त भागाचे कृषी विभागाने सर्वेक्षण करून पीक विम्याच्या माध्यमातून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बाळापूर तालुक्यातील मांजरी येथील शेतकरी महेश गावंडे यांनी ११ एकर शेतात मुगाची पेरणी केली. पेरणीनंतर आंतरमशागत करून पीक फुलविले. कर्ज काढून शेतीला पैसा लावला; पण मूग पिकाने निराशा केली. अचानक हिरवेगार असलेल्या मुगाच्या पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले.
रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी केली; मात्र रोगावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे हैराण झालेल्या शेतकºयाने ५० दिवसांच्या पिकाला अखेर उपटून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. परिसरातील अनेक शेतकºयांनी अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. खारपाणपट्ट्यात येत असलेल्या हातरुण, शिंगोली, मंडाळा, दुधाळा, खंडाळा, निमकर्दा, लोणाग्रा, हातला, मालवाडा या परिसरात मुगाचा पेरा यावर्षी बºयापैकी असल्याचे समजते. बियाणे, खते त्यानंतर पेरणीला मोठा खर्च लागला आहे. आणि अचानक मुगावर रोग आल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.


फुलोºयावर आलेल्या मुगाच्या पिकावर रोग आल्याने पीक अचानक सुकू लागले. लागवडीचा खर्चही वसूल होणार नसल्याने ११ एकरातील मुगाचे पीक उपटून फेकले. आता पेरणीसाठी पैसा नसल्याने शासनाने पीक विम्याच्या माध्यमातून मदत द्यावी.
- महेश ज्ञानदेव गावंडे, शेतकरी, माजरी.

Web Title: 11 acres of Mug crop uprooted and thrown away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.