आडसूळ येथील पूर्णा नदी पात्रात अवैधरित्या गोळा केलेली १०० ब्रास रेती जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:52 IST2020-12-04T04:52:52+5:302020-12-04T04:52:52+5:30

पूर्णा नदी पात्रालगत येणाऱ्या आडसूळ, उमरी, सोनाळा, अंदुरा, हाता, सागद, नागद, दगडखेड,मोखा, काजीखेड, तळेगाव,डवला, बाभुळगाव परिसरातून राजेरोस दिवसरात्र अवैधरित्या ...

100 brass sands illegally collected in Purna river basin at Adsul seized | आडसूळ येथील पूर्णा नदी पात्रात अवैधरित्या गोळा केलेली १०० ब्रास रेती जप्त!

आडसूळ येथील पूर्णा नदी पात्रात अवैधरित्या गोळा केलेली १०० ब्रास रेती जप्त!

पूर्णा नदी पात्रालगत येणाऱ्या आडसूळ, उमरी, सोनाळा, अंदुरा, हाता, सागद, नागद, दगडखेड,मोखा, काजीखेड, तळेगाव,डवला, बाभुळगाव परिसरातून राजेरोस दिवसरात्र अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असून, याकडे महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे त्यामुळे अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियाचे चांगलेच फावले असल्याचे दिसून येते असे असले तेल्हारा तहसीलदार राजेश गुरव यांनी वाळू माफियाविरुद्ध कारवाई करण्यासाठी धडक मोहीम सुरू केली असून, आडसूळ व उमरी येथील पूर्णा नदीच्या पात्रात वाळू माफियांनी गोळा केलेली १०० ब्रास रेती आज तहसीलदार राजेश गुरव यांच्या मार्गदर्शनात तलाठी नंदू मांडवे, मंडळ अधिकारी सावंग यांनी जप्त केली. जप्त केलेली संपूर्ण रेती ट्रकमधे भरून तेल्हारा तहसील कार्यालयात जमा केली आहे.

फोटो:

तेल्हारा तालुक्यात होणारी अवैध वाळू वाहतूक बंद करण्यासाठी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अवैधरित्या वाळू उत्खनन करून शासनाचा महसूल बुडविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यापुढेही कारवाई सुरू राहील.

राजेश गुरव, तहसीलदार, तेल्हारा

Web Title: 100 brass sands illegally collected in Purna river basin at Adsul seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.