१० घरं आगीच्या भक्षस्थानी

By Admin | Updated: June 1, 2014 23:06 IST2014-06-01T21:08:15+5:302014-06-01T23:06:00+5:30

अकोला तालुक्यातील आगर येथे रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीत १० घरं जळून खाक झाली.

10 home firefighters | १० घरं आगीच्या भक्षस्थानी

१० घरं आगीच्या भक्षस्थानी

अकोला- तालुक्यातील आगर येथे रविवारी सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत १० घरं जळून खाक झाली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी घरातील बी-बियाणे, दाग-दागिने, रोख रक्कम आणि शेतमाल आगीच्या भक्षस्थानी पडल्याने सुमारे २0 लाखं रुपयांची वित्त हानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागण्याचे कारण मात्र अद्याप कळू शकले नाही.
अकोला शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आगर या गावात रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गावातील १० घरं जळून खाक झाली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने अकोला, आकोट आणि मूर्तिजापूर येथून तीन बंबांना आग विझविण्यासाठी बोलाविण्यात आले होते. या बंबांना आग विझविण्यासाठी दोन तास लागले. १५ बंब पाणी टाकून आग विझविण्यात आली 

२९ मे रोजी विवाह; १ जूनला संसार बेचिराख!
आगर येथे लागलेल्या आगीत गजानन महादेव अंभोरे नामक युवकाचे घरही भस्मसात झाले. या युवकाचा २९ मे रोजी विवाह झाला होता. १ जूनला लागलेल्या आगीत त्याचा संसार बेचिराख झाला. लग्नात भेटलेल्या भेटवस्तूंसह घरातील सर्वच वस्तू जळून खाक झाल्यात.

Web Title: 10 home firefighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.