शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या व्यावसायिक संकुलांपासून मिळणार १० कोटींचे उत्पन्न

By admin | Updated: May 11, 2017 07:19 IST

रेडिरेकनरनुसार दरवाढ करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला महापौर विजय अग्रवाल यांनी मंजुरी दिली आहे.

अकोला : महापालिकेच्या वाणिज्य संकुलांमधील भाडेपट्ट्यावर दिलेली दुकाने, गाळे व भूखंडधारकांना रेडिरेकनरनुसार दरवाढ करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला महापौर विजय अग्रवाल यांनी मंजुरी दिली आहे. सुधारित दरवाढीमुळे मनपाच्या उत्पन्नात १० कोटींनी वाढ होणार असल्याची माहिती आहे.शहराच्या विविध भागांत मनपाच्या मालकीची २३ व्यावसायिक संकुले आहेत. त्यामधील ४३१ पेक्षा जास्त दुकाने, गाळे अत्यल्प भाडेतत्त्वावर दिल्यामुळे त्या बदल्यात मनपाला वार्षिक अवघे ३२ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत असे. संकुलांमध्ये भाडेपट्ट्यावर दिलेली दुकाने, गाळे व भूखंडधारकांना रेडिरेकनरनुसार भाडेपट्ट्यात सुधारित दरवाढ केल्यास मनपाला वार्षिक सात ते आठ कोटींचे उत्पन्न प्राप्त होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. त्यानुसार सुधारित दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. त्यावेळी प्रशासनाच्या प्रस्तावाला खुद्द भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला होता. तेव्हापासून हा प्रस्ताव पडून होता. मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी हा प्रस्ताव मंजूर होणे गरजेचे होते. ही बाब लक्षात आल्याने महापौर विजय अग्रवाल यांनी व्यावसायिक संकुलांना सुधारित दरानुसार भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. आधी विरोध, आता मंजुरीमनपाच्या व्यावसायिक संकुलांना सुधारित दरानुसार भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव नोव्हेंबर महिन्यात सभागृहासमोर मांडण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासनाच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ४संकुलांमधील व्यावसायिकांची ठोस माहिती न दिल्याची सबब पुढे करीत हा विषय रद्द करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसने मांडला होता. उशिरा का होईना, भाजप नगरसेवकांनी उत्पन्न वाढीसाठी प्रस्तावाला मंजुरी दिली, हे येथे उल्लेखनीय. गाळेधारकांपासून मनपाला केवळ ३० ते ३२ लाखांचे उत्पन्न प्राप्त होत असे. रेडीरेकनरनुसार या रकमेत लक्षणीय वाढ होणार असून, मनपाला किमान ८ ते १० कोटी रुपये वार्षिक उत्पन्न प्राप्त होईल. हा प्रशासनासाठी मोठा दिलासा आहे. -विजय अग्रवाल, महापौर.