काष्टीत दंगल नियंत्रण पथकाकडून तरुणांना चोप; कोरोना संचारबंदीचे केले उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 11:34 AM2020-05-08T11:34:38+5:302020-05-08T11:35:08+5:30

कोरोना संचारबंदी सुरू असताना काष्टी येथे गुरुवारी संध्याकाळी अनेक तरुण रस्त्यावर टोळक्या-टोळक्याने बसले होते. अचानक दंगल नियंत्रण पथकाचे आगमन झाले. या पथकाने रस्यावर बसलेल्या महाभागांना चांगलेच बदडले. त्यामुळे नगरच्या दंगल नियंत्रण पथकाची परिसरात दहशत निर्माण झाली आहे 

Youths beaten by riot control squad in Kashti; Violation of corona curfew | काष्टीत दंगल नियंत्रण पथकाकडून तरुणांना चोप; कोरोना संचारबंदीचे केले उल्लंघन

काष्टीत दंगल नियंत्रण पथकाकडून तरुणांना चोप; कोरोना संचारबंदीचे केले उल्लंघन

Next

काष्टी : कोरोना संचारबंदी सुरू असताना काष्टी येथे गुरुवारी संध्याकाळी अनेक तरुण रस्त्यावर टोळक्या-टोळक्याने बसले होते. अचानक दंगल नियंत्रण पथकाचे आगमन झाले. या पथकाने रस्यावर बसलेल्या महाभागांना चांगलेच बदडले. त्यामुळे नगरच्या दंगल नियंत्रण पथकाची परिसरात दहशत निर्माण झाली आहे 
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पोलीस जीव धोक्यात घालून बंदोबस्त करीत आहेत. कोरोनाविषयी जनजागृती करीत आहेत. परंतु नागरिक पोलिसांना मदत करण्याऐवजी रस्त्यावर काही कारण नसताना गर्दी करीत आहेत. अशावेळी संचारबंदीच्या नियमांचे नागरिकांनी उल्लंघन केले की, नागरिकांना पोलीस बळाचा वापर करावा लागत आहे. बायागती भागातील काही तरुण मोटारसायकली, चार चाकी गाड्या घेऊन रस्त्यावर येतात. काष्टी परिसरात काही नसताना अनेक तरुण, नागरिक आपल्या मोटारसायकली, चारचाकी वाहने घेऊन फिरत असतात. अशा विनाकारण फिरणाºया तरुणांना दंगल नियंत्रण पथकाने चोप दिल्याने चांगली दहशत बसली आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन या पथकाकडून नागरिकांना करण्यात येत आहे. 

Web Title: Youths beaten by riot control squad in Kashti; Violation of corona curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.