मुळा धरणाच्या बॅकवाटरमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 01:38 PM2019-11-23T13:38:18+5:302019-11-23T13:38:58+5:30

मुळा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सवंगड्यांसह पोहण्यास गेलेला युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली़ प्रशांत उत्तम खांडेकर (वय १५, रा.जांभळी, ता़राहुरी) असे या मयत युवकाचे नाव आहे.

Young man drowns in backwater of Mula Dam | मुळा धरणाच्या बॅकवाटरमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

मुळा धरणाच्या बॅकवाटरमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

googlenewsNext

राहुरी : मुळा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सवंगड्यांसह पोहण्यास गेलेला युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली़ प्रशांत उत्तम खांडेकर (वय १५, रा.जांभळी, ता. राहुरी) असे या मयत युवकाचे नाव आहे.
बाळू मामाचे मेंढरं धुण्यासाठी प्रशांत उत्तम खांडेकर सकाळी  आपल्या सवंगड्यांबरोबर गेला होता़प्रशांतचा मृतदेह शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आला़
मुळा धरणाच्या बॅकवाटरमध्ये प्रशांत हा सवंगडी आप्पा बाचकर, अनिल खेमनर, अंकुश बाचकर यांच्यासह गेला गेला होता़ त्याठिकाणी मेंढ्या धुण्याचे काम सुरू होते़ गेल्या दोन दिवसांपासून मेंढ्या जांभळी परिसरात आल्या होत्या़ परवा बाळू मामाची पालखी जांभळी परिसरात येणार होती़ पाण्यात बुडी घेतल्यानंतर प्रशांत पाण्यातून पुन्हा वर न आल्याने सवंगड्यांनी त्याचा शोधाशोध सुरू केला. मात्र ठावठिकाणा न लागल्याने जांभळीचे सरपंच रामदास बाचकर, उपसरपंच पाटीलबा बाचकर, नामदेव खेमनर, दादा बाचकर आदी घटनास्थळी आले़ प्रशांतचा शोध घेण्यासाठी भागवत पवार , भाऊराव पवार, रामनाथ पवार यांच्या सहकाºयांनी एक तास प्रयत्न केला़ त्यानंतर प्रशांतचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला़ प्रशांत खांडेकर हा दहावीच्या वर्गात ढवळपुरी येथे शिक्षण घेत होता़

Web Title: Young man drowns in backwater of Mula Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.