शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पक्षवाढीसाठी काम करा अन्यथा पद सोडा; शिवसेना नेत्यांची पदाधिकाऱ्यांना तंबी

By अरुण वाघमोडे | Published: February 05, 2024 8:23 PM

कदम व चौधरी यांनी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली.

अरुण वाघमोडे, अहमदनगर: अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रिक्त जागांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करा, नवीन शाखा उघडा तसेच शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तळमळीने काम करा. ज्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या ध्येयधोरणाप्रमाणे काम करायचे नाही त्यांनी पद सोडावे, त्यांच्या जागी चांगले काम करणाऱ्यांना संधी दिली जाईल. पदधिकाऱ्यांना अशी तंबी शिवसेनेचे (शिंदे गट ) नगर दक्षिण लोकसभा निरिक्षक अभिजित कदम यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी (दि.५) कदम यांनी शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी पक्षाचे सचिव तथा विभागीय संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते, आनंद शेळके, दामोदर भालसिंग, आमोल हुंबे आदींसह तालुका प्रमुख, महिला आघाडी प्रमुख, युवा सेना प्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. होते. नगर शहरात पुढील महिन्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित मेळावा घेतला जाणार आहे. या संदर्भातील पूर्वतयारी, पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती करणे तसेच पदाधिकाऱ्यांनी सुचविलेली कामे शासकीय निधीतून होतात नाही आदींबाबत कदम यांनी सूचना केल्या. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचनाला. यामध्ये प्रामुख्याने सरकारी कार्यालयात शिवसैनिकांची कामे होत नाहीत, अधिकारी ऐकत नाहीत. अशा स्वरुपाच्या या तक्रारी होत्या. या तक्रारींची नोंद घेऊन त्यावर कार्यवाही केली जाईल असे कदम यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान कदम व चौधरी यांनी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली.जिल्ह्यात पक्षवाढीसाठी संघटनेची बांधणी करावी, मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना तळागळातील घटकांपर्यंत पोहोचतात की, नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ज्या पदाधिकाऱ्यांना संघटनेत काम करण्यासाठी वेळ नाही त्यांच्या जागी चांगले काम करणाऱ्यांना संधी द्या, अशा सूचना नगर येथे झालेल्या बैठकीत जिल्हा प्रमुखांना दिल्या आहेत. - अभिजित कदम, लोकसभा निरिक्षक शिवेसना

टॅग्स :Shiv Senaशिवसेना