शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

औरंगाबादची जिजामाता भेंडावर मात : ३२ व्या राज्यस्तरीय १९ वर्षाखालील क्रॉम्टन क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 6:33 PM

हरमीतसिंग रागीची फटकेबाजी आणि विशाल शेटे याच्या धारदार गोलदांजीच्या बळावर विनर्स औरंगाबाद संघाने भेंड्याच्या जिजामाता ज्युनिअर कॉलेज संघाचा ३१ धावांनी पराभव केला. ६१ चेंडूत ९१ धावा चोपणा-या हरमीतसिंग रागीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

ठळक मुद्दे३२ व्या क्रॉम्टन ग्रीव्हज राज्यस्तरीय करंडक क्रिकेट स्पर्धा ३१ धावांनी भेंड्याचा पराभवहरमीत रागी सामनावीर

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : हरमीतसिंग रागीची फटकेबाजी आणि विशाल शेटे याच्या धारदार गोलदांजीच्या बळावर विनर्स औरंगाबाद संघाने भेंड्याच्या जिजामाता ज्युनिअर कॉलेज संघाचा ३१ धावांनी पराभव केला. ६१ चेंडूत ९१ धावा चोपणा-या हरमीतसिंग रागीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. अहमदनगर जिल्हा क्रीकेट असोसिएशन व क्रॉम्टन ग्रीव्हज लिमिटेड, नगर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय १९ वषार्खालील ३२ व्या क्रॉम्प्टन क्रिकेट करंडक स्पर्धेला येथील जिल्हा क्रीडा संकुलातील वाडिया पार्क येथे रविवारपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धे्तील दुसरा सामना मंगळवारी विनर्स औरंगाबाद विरुध्द जिजामाता ज्युनिअर कॉलेज भेंडा यांच्यात रंगला. विनर्स औरंगाबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलदांजीचा निर्णय घेतला. संघाने निर्धारित ४० षटकांत ६ बाद २४१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सलामीला आलेल्या हरमीतसिंग रागी याने भेंडा संघाची गोलंदाजी फोडून काढली. अवघ्या ६१ चेंडूत ६ षटकार लगावत ९१ धावा चोपल्या. त्याला साथ देत करण लवेरा याने ५९ धावा केल्या. श्रीनिवास कुलकर्णी याने २७ तर विशाल शेटे याने २० धावांचे योगदान दिले. भेंडा संघाच्या सुरज जाधव याने ५ षटकात १४ धावा देत २ तर अंकित मिश्रा याने ५५ धावा देत २ बळी मिळवले.प्रत्युउत्तरादाखल विजयासाठी २४२ धावांचे लक्ष्य भेंडा संघाला पेलवले नाही. सलामीला आलेल्या सुरज जाधव याने ६४ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या फलंदाजाही विजयासाठी प्रयत्न केले मात्र विजय मिळवून देण्यास त्यांना यश आले नाही. केशव बोरुडे याने ३३ धावा ठोकल्या. अक्षय चांदगुडेने १८ तर उत्सव सिन्हा याने १६ धावांचे योगदान दिले. सर्व संघ ३५ षटकांत २१० धावात गारद झाला. औरंगाबाद संघाकडून विशाल शेटे याने भेदक गोलंदाजी केली. त्याने ५ षटकांत ३१ धावा देत ४ गडी बाद केले. त्याला साथ देत करण लवेरा, सौरभ जाधव व हिमांशु मुकुंद यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. या भेदक गोलंदाजीमुळे औरंगाबाद संघाने ३१ धावांनी विजय मिळविला. विनर्स औरंगाबादकडून ९१ धावा करणा-या हरमितसिंग रागी यास सामनावीर घोषित करण्यात आले. धाव लेखनाचे काम अजय कविटकर यांनी पाहिले.उद्याचा सामना -वेंगसकर अ‍ॅकेडमी पुणे विरुध्द परभणी जिल्हा क्रिकेट असोसिएशन

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCricketक्रिकेट