शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

काकस्पर्श होण्यासाठी श्रीगोंदा शहरामधील बंधा-यातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:59 PM

श्रीगोंदा शहरात दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्याने सत्ताधारी - विरोधकांनी एकत्र येऊन बंधा-यातील पाणी सोडून दिले. शहरातील गोरे मळा बंधा-यातील लाख मोलाचे पाणी सोडून देण्यात आले.

ठळक मुद्देलोकवर्गणीतून गोरे मळा बंधा-यासाठी ८ ते १० लाख रुपये खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्याने सत्ताधारी - विरोधकांनी एकत्र येऊन बंधा-यातील पाणी सोडून दिले. शहरातील गोरे मळा बंधा-यातील लाख मोलाचे पाणी सोडून देण्यात आले. एकिकडे शासन पाण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवत असताना दुसरीकडे काकस्पर्र्शासाठी बंधा-यातील पाणी सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाणी सोडून दिल्याने काकस्पर्श होईल का यावरही उलट सुलट चर्चा सुरू आहे.सोमवारी सायंकाळी गोरे मळा बंधा-यातील पाणी सोडण्यात आले. यावेळी सतीष मखरे, राजू गोरे, अशोक आळेकर, एम.डी. शिंदे उपस्थित होते. श्रीगोंदा शहरातील सरस्वती नदीवर गोरे मळा बंधारा  आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बंधा-यातील पाणी दशक्रिया ओट्यापर्यत आले होते. या पाण्यावर शेवाळ साचल्याने दशक्रिया विधी करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे निवडक लोकांचे म्हणणे होते. या शेवाळयुक्त पाण्यामुळे काकस्पर्श होत नाही त्यामुळे बंधा-यातील पाणी सोडून देण्याची भुमिका सत्ताधारी व विरोधकांनी घेतली. त्यानंतर बंधा-यातील पाणी सोडून देण्यात आले. बंधा-यातील पाणीसोडल्याने नेमके काय साध्य होणार आहे असा सवाल सरस्वती नदी सुशोभीकरणाचे प्रवर्तक गोरख आळेकर यांनी उपस्थित केला आहे.लोकवर्गणीतून बंधा-याचे काम -उन्हाळ््यात या परिसरात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकत्र येत गेल्या वर्षी लोकवर्गणीतून गोरे मळा बंधा-यासाठी ८ ते १० लाख रुपये खर्च केले. या माध्यमातून सरस्वती नदीमधील गाळ काढून रुंदीकरण करण्यात आली. या कामासाठी शासनाने कसल्याही प्रकारची मदत केली नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाWaterपाणी