वांबोरी चारीसाठी पाणी सोडले; ओव्हरफ्लोने भरणार बंधारे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:44 PM2019-11-01T12:44:01+5:302019-11-01T12:44:30+5:30

मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी ९५ क्युसेकने पाणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते सोडण्यात आले़ ओव्हरप्लोने कार्यक्षेत्रातील सर्व बंधारे भरण्यात येणार आहेत.

Water left for Wambori Chari; Ports to be filled with overflow | वांबोरी चारीसाठी पाणी सोडले; ओव्हरफ्लोने भरणार बंधारे 

वांबोरी चारीसाठी पाणी सोडले; ओव्हरफ्लोने भरणार बंधारे 

Next

राहुरी : मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी ९५ क्युसेकने पाणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते सोडण्यात आले़ ओव्हरप्लोने कार्यक्षेत्रातील सर्व बंधारे भरण्यात येणार आहेत. पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पाऊस सुरू असून धरणाकडे १४०० क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे.
गुरूवारी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मुळा धरणावर जाऊन कळ दाबली़. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे, कार्यकारी अभियंता किरण देशमुख, उपअभियंता सायली पाटील, अभियंता पी़पी़ तनपुरे उपस्थित होते़.
मुळा धरणात सध्या २६ हजार दलघफू पाणीसाठा आहे़. कोतूळ येथून १४०० क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे़. मुळा नदी पात्रातून ७०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे सुरू आहे़. डाव्या कालव्यातून ३० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे़. उजव्या कालव्यातून शेतीसाठी ६०० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे़. मुळा धरणाच्या पाणलोट व लाभ क्षेत्रावर गुरूवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते़. तुरळक स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली़ परतीचा पाऊस ९ नोव्हेंबरपर्यंत हजेरी लावण्याची शक्यता आहे़. 
दोन्ही कालवे व नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी उंचावण्यास मदत झाली आहे़. पंधरा दिवस पाण्याची आवक सुरू राहाण्याची शक्यता आहे़. ढगाळ हवामान व पडणा-या पावसामुळे बाजरी, कपाशी, सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे गणित धोक्यात आले आहे़.
मुळा धरणातून वांबोरी चारीखाली असलेले बंधारे ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरण्यात येणार आहेत. वांबोरी चारीसाठी ९५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे़. वांबोरी चारीसाठी ६८० दलघफू पाणी मंजूर आहे़. सध्या सोडण्यात आलेले पाणी राखीव पाण्याव्यतिरिक्त आहे़. पाणलोट क्षेत्रावर यंदा समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे़. त्यामुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे़, असे मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले.
    

Web Title: Water left for Wambori Chari; Ports to be filled with overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.