संगमनेर तालुक्यातील कुरणमध्ये आचारसंहितेचा भंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 17:47 IST2021-01-15T17:46:56+5:302021-01-15T17:47:31+5:30
कुरण ग्रामपंचायतीची शुक्रवारी (दि.१५) सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाकडून आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गुरुवारी (दि.१४) कुरण येथील ग्रामस्थ सज्जाद आसीफ शेख यांनी केली आहे.

संगमनेर तालुक्यातील कुरणमध्ये आचारसंहितेचा भंग
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील कुरण ग्रामपंचायतीची शुक्रवारी (दि.१५) सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाकडून आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गुरुवारी (दि.१४) कुरण येथील ग्रामस्थ सज्जाद आसीफ शेख यांनी केली आहे.
कुरण गामपंचायतीच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळ व शेतकरी परिवर्तन आघाडी, असे दोन पॅनल आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार १३ जानेवारीला संपला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही पॅनलला प्रचार बंद करण्याची वेळ, मर्यादा ठरवून दिली होती. असे असताना शेतकरी विकास मंडळाचे सर्व कार्यकर्ते व उमेदवाराने आचारसंहितेचा भंग करून त्यांची प्रचार सभा व रॅली सुरू ठेवली. याबाबत ग्रामपंचायतीच्या तसेच गावातील इतरही नागरिकांच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले आहे.
१३ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी २.३० ही वेळ प्रचार, रॅलीसाठी दिली असताना त्यानंतर दुपारी ३ ते ३.३० वाजेपर्यंत शेतकरी विकास मंडळाचा प्रचार व रॅली सुरू होती. शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते व उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असून, त्यांच्यावर कायेदशीर कार्यवाही करावी, असे तक्रार अर्जात म्हटले असून, त्यावर तक्रारदार शेख यांचे नाव व सही आहे.
कुरण ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आचारसंहिता भंगाबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. याबाबत वस्तुनिष्ठ चौकशीसाठी कुरण ग्रामपंचायतीकडून अहवाल मागविला आहे, असे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी सांगितले.