शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

गावक-यांनी वाळू तस्करांना पिटाळले : वांगी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:25 AM

तालुक्यातील सराला गोवर्धन तसेच उक्कलगाव, दवणगाव परिसरात वाळू तस्करांनी बेसुमार उपसा केलेला असताना आता प्रवरा नदीपात्रातील वांगी परिसराकडे मोर्चा वळविला.

श्रीरामपूर : तालुक्यातील सराला गोवर्धन तसेच उक्कलगाव, दवणगाव परिसरात वाळू तस्करांनी बेसुमार उपसा केलेला असताना आता प्रवरा नदीपात्रातील वांगी परिसराकडे मोर्चा वळविला. मात्र गावकऱ्यांनी एकजूट दाखवत गावठी कट्ट्याने धमकाविणा-या वाळू तस्करांना पिटाळून लावले. आता पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे.श्रीरामपुरातील वाळू तस्करी कोणत्या थराला गेली आहे हे या घटनेवरुन उघड झाले आहे. गोदावरी नदीला पाणी आल्याने वाळू तस्करांचा मोर्चा आता प्रवरेकडे वळाला आहे. तेथे ते जम बसवू पाहत आहेत. मंगळवारी रात्री वांगी परिसरात काही वाळू तस्कर मालमोटारी व इतर वाहने घेऊन आली. वाळू उपशा करण्यासाठी आले असता याची खबर गावकऱ्यांना लागली. यावेळी सरपंच काकासाहेब साळे, उपसरपंच सोमनाथ पवार, विष्णू जगताप, कैलास जगताप, माऊली पवार, राहुल पवार, किरण जगताप, सर्जेराव जगताप, शांतीलाल पवार, किशोर जगताप, राहुल साळे, बाळासाहेब रोहोकले, सुभाष मोरे, भगिरथ जगताप, भगिरथ मोरे, चिलीया जगताप व इतर ५० ते ६० ग्रामस्थांनी रात्री गावात एकत्र येऊन वाळू तस्करांना विरोध केला.यावेळी काही तस्करांनी गावठी कट्टे दाखवून ग्रामस्थांना धमकविण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी फावड्यांचे दांडे, दगड उचलत धाडसाने वाळू रोखण्याची भूमिका घेतली. त्यामुळे वातावरण पाहून वाळू तस्कर गाड्यांसह फरार झाले. सरपंच काकासाहेब साळे यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. उपअधीक्षक राहुल मदने यांना घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस फौजफाटा पाठविला. ग्रामस्थांबरोबर चर्चा केली.ग्रामस्थ सामूहिकरित्या प्रशासनाला निवेदन देणार असल्याचे सरपंच काकासाहेब साळे यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे वाळू तस्करांचा डाव वांगी परिसरात हाणून पाडण्यात आला. पोलिसांनीही तत्परता दाखविली. याप्रकरणी उशिरापर्यंत लेखी तक्रार देण्यात आली नव्हती. ग्रामस्थही गावठी कट्ट्याच्या प्रकारामुळे भयभीत झाले. मात्र संघटितपणामुळे वांगी ग्रामस्थ वाळू तस्करांना भारी भरले.जिल्हा पोलीस प्रमुख ईशू सिंधू यांनी वाळू उपशाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलीस दलही सतर्क झाले आहे. त्यामुळे वांगी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर