शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 10.35% मतदान
3
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
4
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
5
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
6
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
7
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
8
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
9
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
10
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
11
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
12
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
13
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
14
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
15
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
16
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
17
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
18
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
19
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
20
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका

संगमनेर तालुक्यात चार संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 7:58 PM

अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात  मुगदरा येथे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने एकास मारहाण करून जखमी करणा-या चार संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत पकडून घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देअकलापूर येथील घटनाएअरगन, तलवार, कोयता जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबोटा : अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात  मुगदरा येथे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने एकास मारहाण करून जखमी करणा-या चार संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत पकडून घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित चोरटे हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अकलापूर, मुंजेवाडी परिसरातील मुगदरा येथे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी भाऊसाहेब भीमाजी जाधव यांच्या घरात जाऊन त्यांना तीक्ष्ण हत्याराने हातावर मारहाण करीत घरातील पत्र्याची पेटी पळवून नेली. जाधव यांनी आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरवात केली.दरम्यान ग्रामस्थ पकडणार या भितीने चोरट्यांनी तेथील डोंगराचे कपारीचा आधार घेतला. मंगळवारी सकाळी या डोंगरावर चार जण संशयितपणे जात असल्याचे एकाच्या निदर्शनास आले. ही बाब ग्रामस्थांना सांगण्यात आल्यावर ग्रामस्थ डोंगराजवळ जमा झाले. त्यांनी या चारही जणांना शिताफीने पकडले. ग्रामस्थांसमोर त्यांनी भाऊसाहेब जाधव यांना मारहाण करून चोरी केल्याचे सांगितले. घारगाव पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक दिलीप निघोट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार हे घटनास्थळी आले. त्यांनी चोरट्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. संतोष शिवाजी जाधव (रा. आभाळवाडी), संतोष दत्तू धांडे (श्रीगोंदा), शरद बन्सी निचीत (वडनेर बुद्रुक,ता. शिरुर), चंदर दादाभाऊ गाडे (जवळा, ता. पारनेर) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर अनेक चोरीचे गुन्हे असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.चोरट्यांकडे सापडली हत्यारेअकलापूर येथे पकडलेल्या चोरट्यांकडे एअरगन, तलवार व कोयता ही हत्यारे व मिरची पूड घारगाव पोलिसांना तपासादरम्यान आढळून आले आहे. या चोरट्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. अनेक चोरीच्या घटना या चोरट्यांकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरCrimeगुन्हा