विधानसभा निवडणूक निकाल : अहमदनगर जिल्ह्यात सात ठिकाणी राष्ट्रवादी  काँग्रेस आघाडीवर; दोन ठिकाणी काँग्रेस, भाजपला आघाडी; नेवाशातून अपक्ष गडाख आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:58 AM2019-10-24T10:58:22+5:302019-10-24T10:58:39+5:30

विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड, पारनेर, शेवगाव, अहमदनगर, राहुरी, अकोले, कोपरगाव मतदारसंघातून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. संगमनेर, श्रीरामपूर मतदार संघातून काँग्रेस तर शिर्डी, श्रीगोंद्यात भाजप आघाडीवर आहे. नेवाशात अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख आघाडीवर आहेत. 

Vidhan Sabha Election Results: NCP leads in seven places in Ahmednagar district; Congress, BJP lead in two places; Independent Gadakh leads from Nevasha | विधानसभा निवडणूक निकाल : अहमदनगर जिल्ह्यात सात ठिकाणी राष्ट्रवादी  काँग्रेस आघाडीवर; दोन ठिकाणी काँग्रेस, भाजपला आघाडी; नेवाशातून अपक्ष गडाख आघाडीवर

विधानसभा निवडणूक निकाल : अहमदनगर जिल्ह्यात सात ठिकाणी राष्ट्रवादी  काँग्रेस आघाडीवर; दोन ठिकाणी काँग्रेस, भाजपला आघाडी; नेवाशातून अपक्ष गडाख आघाडीवर

googlenewsNext

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड, पारनेर, शेवगाव, अहमदनगर, राहुरी, अकोले, कोपरगाव मतदारसंघातून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. संगमनेर, श्रीरामपूर मतदार संघातून काँग्रेस तर शिर्डी, श्रीगोंद्यात भाजप आघाडीवर आहे. नेवाशात अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख आघाडीवर आहेत. 
कर्जत-जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार १२ हजार मतांनी तर पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी दुस-या फेरीत १० हजार मतांनी आघाडीवर आहेत. शेवगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे, अहमदनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे आघाडीवर आहेत.  राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आघाडीवर आहेत. कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे  आघाडीवर आहेत. शिर्डीतून भाजपचे राधाकृष्ण विखे यांनी जवळपास ३० हजार मतांची आघाडी घेतली आहे. संगमनेरमधून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सहाव्या फेरीअखेर १२ हजार २३६ मतांनी आघाडीवर आहेत. 
नेवासा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे (अपक्ष) उमेदवार शंकरराव गडाख हे २५९१ मतांनी आघाडीवर आहेत. श्रीगोंद्यातून भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते हे पहिल्या फेरीत २५०० मतांनी आघाडीवर आहेत. श्रीरामपूरमधून काँग्रेसचे लहू कानडे हे आघाडीवर आहेत. अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे हे ९३०० मतांनी आघाडीवर होते. 

Web Title: Vidhan Sabha Election Results: NCP leads in seven places in Ahmednagar district; Congress, BJP lead in two places; Independent Gadakh leads from Nevasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.