Vidhan Sabha Election Results: NCP leads in five places in Ahmednagar district | विधानसभा निवडणूक निकाल : अहमदनगर जिल्ह्यात पाच ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवर

विधानसभा निवडणूक निकाल : अहमदनगर जिल्ह्यात पाच ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवर

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड, पारनेर, शेवगाव, अहमदनगर, राहुरी मतदारसंघातून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर श्रीरामपूर मतदार संघातून काँग्रेस तर श्रीगोंद्यात भाजप आघाडीवर आहे. 

कर्जत-जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार तीन हजार मतांनी तर पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके, शेवगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे, अहमदनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आघाडीवर आहेत.
नेवासा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे (अपक्ष) उमेदवार शंकरराव गडाख हे आघाडीवर आहेत. श्रीगोंद्यातून भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते हे आघाडीवर आहेत. श्रीरामपूरमधून काँग्रेसचे लहू कानडे हे आघाडीवर आहेत. 
दरम्यान कर्जत-जामखेड मतदारसंघातून पालकमंत्री राम शिंदे, सेनेचे विजय औटी पिछाडीवर होते. 

Web Title: Vidhan Sabha Election Results: NCP leads in five places in Ahmednagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.