अंशदायी पेन्शनचे सॉफ्टवेअर अद्ययावत करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:18 AM2021-03-07T04:18:39+5:302021-03-07T04:18:39+5:30

अहमदनगर : शासनाच्या नवीन तरतुदीचा लाभ मिळण्यासाठी अंशदायी पेन्शनचे सॉफ्टवेअर अद्ययावत करावे, अशी मागणी जुनी पेन्शन हक्क समितीने केली ...

Update the contributory pension software | अंशदायी पेन्शनचे सॉफ्टवेअर अद्ययावत करावे

अंशदायी पेन्शनचे सॉफ्टवेअर अद्ययावत करावे

googlenewsNext

अहमदनगर : शासनाच्या नवीन तरतुदीचा लाभ मिळण्यासाठी अंशदायी पेन्शनचे सॉफ्टवेअर अद्ययावत करावे, अशी मागणी जुनी पेन्शन हक्क समितीने केली आहे. याबाबत समितीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या लेखाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, अंशदान निवृत्ती योजनेसाठी अद्ययावत सॉफ्टवेअर सुरू करावे. अंशदान निवृत्ती योजनेमध्ये सुरुवातीला शासन हिस्सा १० टक्के होता, तो १ एप्रिल २०१९ च्या शासन आदेशाने १४ टक्के झाला आहे. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला टप्पा हिशेबामध्ये समाविष्ट होण्यासाठी बदल करणे आवश्यक आहे. तरी त्वरित अद्ययावत सॉफ्टवेअर उपलब्ध करावे, अशी मागणी जुनी पेन्शन हक्क समितीच्या वतीने करण्यात आली.

तसेच माहेवार कपातीबाबत ज्यांची अद्याप डाटा एंट्री झाली नाही अशा शिक्षकांची पंचायत समितीकडून माहिती घेऊन डाटा एन्ट्री पूर्ण करावी, शिक्षकांची नावे, जन्मदिनांक, सेवारंभ दिनांक याबाबी त्वरित दुरुस्त करून पावत्या पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून द्याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जुनी पेन्शन हक्क समिती जिल्हाध्यक्ष कैलास ठाणगे, राज्य प्रतिनिधी प्रताप पवार, ऋषी गोरे, किशोर राठोड, अनिल शिंदे, दत्ता राठोड, शहाराम येरकळ, सय्यद जावेद, विजय जाधव, योगेश शिंदे, साई शिंदे, चंद्रकांत शिंदे, अमोल दळवी, मुक्ता बारगजे आदींची नावे आहेत.

Web Title: Update the contributory pension software

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.